राज्य सरकारने कोरोनाची स्थिती बघता जमिनींचे शासकीय बाजारमूल्य म्हणजेच रेडिरेकनरचे दर कायम ठेवण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. क्रेडाई आणि क्रेडाई मेट्रो नाशिकने रेडिरेकनरचे दर प्राप्त परिस्थितीत वाढवू नये, यासाठी पाठपुरावा केला होता. त्याला यश आले आहे. घरबांधणी करणारे ग्राहक आणि विकासक या दोघांनाही त्याचा फायदा होईल.
- रवि महाजन अध्यक्ष क्रेडाई मेट्रो.
कोट...
राज्य सरकारने रेडिरेकनरच्या दरात आता वाढ केली नसली तरी गेल्या वर्षी केलेली वाढ देखील खूप अधिक होती. म्हणजेच सरासरी पाच टक्के इतकी दरवाढ सांगितली गेली तरी फुटनोटच्या माध्यमातून ती कैकपटीने अधिक होती. त्यामुळे फायदा झाला नाही. आताही मुद्रांक शुल्कात वाढ दिली नाही तसेच महिलांना १ टक्का मुद्रांक शुल्कात सवलत दिली तरी ती फार भरीव नाही. त्यातील अटीही सुलभ नाहीत. त्यामुळे २०२२ पर्यंत सर्वांना घरे देण्याचे उद्दिष्ट कसे पूर्ण होणार?
- अविनाश शिरोडे, बांधकाम तज्ज्ञ, नाशिक