तिडकेनगरच्या प्रियंका पार्कमधील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे होते. शहरात असूनही अतिदुर्गम भागात राहत असल्यासारखी रहिवाशांची स्थिती होती. तिडकेनगरमध्ये काही रस्त्यांचे डांबरीकरण झाले. येथेही डांबरीकरण व्हावे, अशी आग्रही मागणी शिवसैनिक व सत्कार्य फाऊंडेशन, रहिवाशांनी केली होती. तरीही तांत्रिक अडचण पुढे करून महापालिका अधिकाऱ्यांनी डांबरीकरण करण्यास टाळाटाळ केली. प्रियंका पार्कसह संपूर्ण परिसरातील अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण न झाल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेनेच्यावतीने देण्यात आला होता. या सततच्या पाठपुराव्यानंतर शनिवारी (दि. २९) मनपाच्यावतीने या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. यावेळी रहिवाशांनी रस्त्याची पूजा करून फुले उधळून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी बाबासाहेब गायकवाड, महिला आघाडीच्या चारूशिला गायकवाड, शिवसेना शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, डॉ. राजाराम चोपडे, डॉ. आर. ओ. पाटील, रवींद्र सोनजे, प्रभाकर खैरनार, हंसराज वडघुले, बाळासाहेब तिडके, दिलीप तिडके, आशुतोष तिडके, रमेश सूर्यवंशी, मनोज पाटील, डॉ. राजाराम पाटील, डॉ. धनंजय चौधरी, यशवंत जाधव, डॉ. प्रमोद महाजन, डॉ. दिग्विजय पाटील, संजय टकले आदी रहिवासी उपस्थित होते.
चौकट.====
वनवास संपला
शहराच्या मध्यवर्ती भागात राहत असूनही अतिदुर्गम भागात राहत असल्यासारखे वाटत होते. सतरा वर्षांनंतर डांबरीकरण झाल्याने आता वनवास संपल्यासारखे वाटते. यामुळेच रस्त्याची पूजा करून फुले उधळून आनंदोत्सव साजरा केला, अशी भावना सुरेखा बोंडे, साधना कुवर, नीलिमा चौधरी, डॉ. आर. ओ. पाटील यांच्यासह रहिवाशांनी व्यक्त केली.
(फोटो २९ रस्ता)