निफाड : रामनवमीसाठी शिर्डी येथे जाणाऱ्या साई पालखीचे येथे स्वागत करण्यात आले. सुरत येथील राममढी आश्रम ,जहांगीरपुरा येथील साई सेवक युवक मंडळ दरवर्षी सुरत येथून शिर्डी येथे साई पालखी घेऊन जात असते . दरवर्षी ही साई पालखी निफाड मार्गे जात असतांना या साई पालखीचे निफाड येथे शांतीनगर त्रिफुलीवर असलेल्या हॉटेल माऊलीचे संचालक शंकर बोडके यांनी स्वागत करत साईभक्तांना अल्पोपहार दिला. या पालखीसोबत राजेंद्र पटेल, निलेश पटेल, योगेश पटेल, सुनील पटेल, हरिष पटेल , राजुभाई रांधेरीया , प्रमोद पटेल , बल्लूभाई पटेल ,यांच्यासह ३०० साईभक्त सामील झाले आहेत ही पालखी सुरत येथून दि २ एप्रिल रोजी निघाली. निफाड येथे आली असता शंकर बोडके व सौ ज्योती बोडके यांनी व त्यांच्या परिवाराने साईमुर्तीचे पूजन केले. याप्रसंगी संपत व्यवहारे , प्रा.चंद्रभान जाधव , किशोर बस्ते , गणेश नागरे, ज्ञानेश्वर व्यवहारे ,गौरव व्यवहारे , बापू कराड , रतन चकोर , विशाल कापसे , राजु राऊत ,मयुर व्यवहारे , वेदांत बोङके , वैष्णव बोडके , सोमनाथ ताडगे , किरण तूपलोंढे.,मोनाली व्यवहारे ,सपना व्यवहारे.जियसंग यादव , राजेश यादव , आदी उपस्थित होत.े ही साई पालखी दि ११ एप्रिल रोजी शिर्डी येथे पोहचणार आहे.
निफाड येथे साई पालखीचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 3:10 PM