श्री देवनंदीजी महाराज यांनी मंत्रोच्चार करत पूजाविधी केला. त्यानंतर प्रीतम शहा (पळसदेवकर), प्रकाश शेठी व विजय कासलीवाल (नांदेड) या परिवाराच्यावतीने पूजन करण्यात आले. मांगीतुंगीजी ट्रस्टचे अध्यक्ष सुमेर काला, रवींद्र पाटणी यांनी पाषाणावर पुष्पवृष्टी केली तर संतोष पेंढारी (नागपूर), तीर्थरक्षा कमिटी संजय पापडीवाल, ललित पाटणी यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. शैलेश कासलीवाल, पवन पाटणी, मनोज शहा, रवींद्र पहाडे, पारस लोहाडे, वर्धमान पांडे, राजेंद्र कासलीवाल, मनोज कासलीवाल, प्रवीण संचेती यांच्या हस्ते आचार्य कुंथुसागर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. आचार्य श्री देवनंदीजी महाराज व नवीन नंदिजी महाराज यांचे प्रज्ञाश्रमन बहुमंडलच्या वतीने पादप्रक्षालन करण्यात आले. सूत्रसंचालन प्रवीण लोहाडे यांनी केले तर ब्रह्मचारी वैशालीदीदी यांनी आभार मानले.
इन्फो
मान्यवरांच्या ऑनलाईन शुभेच्छा
याप्रसंगी केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल, खासदार कृपाल तुमाणे, जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी ऑनलईन भाषणात शुभेच्छा दिल्या व नमोकार तीर्थावर भविष्यात लागणाऱ्या कार्यांसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. महावीर गंगवाल, अनिल जमगे, प्रमोद कासलीवाल, माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, नवीन पहाडे, विनोद लोहाडे, जयकुमार कासलीवाल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले .
फोटो- ०५ चांदवड जैन
मालसाणे येथे णमोकार तीर्थ येथे पाषाणाचे स्वागत प्रसंगी राष्ट्रसंत देवनंदीजी महाराज. समवेत माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, वैशाली दीदी आदींसह मान्यवर.
===Photopath===
050621\05nsk_33_05062021_13.jpg
===Caption===
फोटो- ०५ चांदवड जैन मालसाणे येथे णमोकार तीर्थ येथे पाषाणाचे स्वागत प्रसंगी राष्ट्रसंत देवनंदीजी महाराज. समवेत माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, वैशाली दीदी आदींसह मान्यवर.