नवीन वह्या व पुस्तके, नवे दप्तर घेऊन विद्यार्थी देखील शाळेच्या पहिल्या दिवसासाठी सज्ज झाले होते. कळवण शहर व तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या २०३ व खासगी अनुदानित ४३ अशा एकूण २४६ शाळांमधील पहिली ते आठवीमधील 26983 विद्यार्थ्यांना मोफत शालेय पुस्तके वाटप करण्यात आली. कळवण शहरासह तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक मराठी माध्यमाच्या शाळा सोमवारपासून सुरू झाल्या. त्यासाठी रविवारपासून तालुक्यातील शाळांमध्ये नियोजन करण्यात येऊन शिक्षक व शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली होती.आर के एम माध्यमिक शाळेत मुले येताच त्यांचे अनोख्या उत्साहात स्वागत करण्यात आले तसेच पहिल्याच दिवशी कळवण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅड शशिकांत पवार, सरचिटणीस बेबीलाल संचेती, मुख्याध्यापक एल. डी. पगार, पर्यवेक्षक एन. डी. देवरे, जे. आर. जाधव यांच्या हस्ते शालेय पुस्तकांचे वाटप करण्यात आले.त्यानंतर विद्यार्थ्यांंना मिष्टान्न भोजन देण्यात आले . पहिल्याच दिवशी शालेय गणवेशात न येता पारंपरिक वेशभूषा करु न आलेल्या ६ वी ते ९ वीच्या विद्यार्थ्यांना कळवण शिक्षण संस्था व आर के एम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नावाचा बॅज देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.सोमवारपासून शाळा उघडणार म्हणून शनिवार व रविवारी शहरातील स्टेशनरी दुकानावर शालेय साहित्य खरेदीसाठी पालक व विद्यार्थी यांनी गर्दी केल्याचे दिसून आले. विद्यार्थ्यांना पसंत पडणाऱ्या स्कूल बॅग, वॉटर बॅग, शूज, वह्या खरेदी करण्यास पालकांनी प्राधान्य दिल्याचे विक्र ेते किशोर कोठावदे व अनिल मालपुरे यांनी सांगितले . शिक्षण विभागाने शाळांना सूचना दिल्याप्रमाणे पहिल्या दिवशी सकाळी ८ ते ९ या वेळेत शाळेचा परिसर स्वच्छ करण्यात येऊन ग्रामीण व आदिवासी भागात सकाळी ७ ते ७.३० या वेळेत गावात प्रभात फेरी काढण्यात आली . त्यानंतर विद्यार्थ्यांंना पाठ्यपुस्तके आणि फुल देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. सकाळी १० वाजता परिपाठ घेण्यात येऊन त्यानंतर अध्यापनास सुरु वात करण्याची सूचना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने प्राथमिक शाळांना दिल्या होत्या.
शाळेच्या पहिल्या दिवशी दिंडी, मिरवणूकीद्वारे विद्यार्थ्यांचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 5:22 PM