कळवण : आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून खर्डा किल्ल्यावर देशातील सर्वांत उंच ध्वजाची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. या स्वराज्य ध्वज यात्रेचे उत्तर महाराष्ट्राचे आराध्यदैवत सप्तशृंगी निवासनी देवीच्या गडावर पहिल्या पायरीवर पूजन करून ग्रामस्थांनी उत्साहात स्वागत केले. यावेळी आमदार नितीन पवार व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार यांनी ध्वजपूजन करून यात्रेचे स्वागत केले. यात्रेचे प्रमुख स्वराज्य रथ सेवेकरी ऋषिकेश करभाजन, नाना गवळी यांचा जयश्री पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ढोलताशा आणि मराठमोळ संबळ्याच्या गजरात जय अंबेचा जयघोष करत स्वराज्य ध्वजाची गावातून मिरवणूक काढण्यात आली. देवी ट्रस्टचे विश्वस्त व अधिकारी, ग्रामपंचायत सरपंच व सदस्य व ग्रामस्थांनी स्वराज्य ध्वजाची पूजा केली.
यावेळी राजेश गवळी, संदीप बेनके, अजय दुबे, दीपक जोरावर, शांताराम गवळी, शांताराम सदगीर, गणेश बर्डे, प्रवीण दुबे, तुषार बर्डे, वैभव धुमसे, रोहित आहिरे, वसंत साळुंखे, दिलीप बर्डे, विजय दुबे, मधुकर गवळी जुगल उपाध्ये, रमेश पवार, योगेश कदम, ईश्वर कदम, राहुल पोटे व महिला भगिनी, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या उत्साहात उपस्थित होते.
--------------------
७४ ठिकाणी ध्वज जाणार
अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथील शिवपट्टण अर्थात खर्डा किल्ल्यावर देशातील सर्वांत उंच ध्वज उभारला जात आहे. यात्रेचे कोविडच्या सर्व नियमांचे पालन करत दुपारी गडावर आगमन झाले. लोकसहभागातून महाराष्ट्रासह देशभरातील विविध ७४ प्रमुख आध्यात्मिक, धार्मिक ठिकाणे तसेच संतपीठे व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले या शक्तिपीठांच्या ठिकाणी तसेच श्रीराम मंदिर (अयोध्या), मथुरा, बोधगया (बिहार), केदारनाथ (उत्तराखंड) आदी ठिकाणी ध्वज नेण्यासाठी स्वराज्य ध्वज पूजन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
---------------------
विनम्रता, परमार्थ व त्याग शिकवणारा हा भगवा ध्वज महाराष्ट्राचा मानबिंदू आहे. शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याची ओळख अवघ्या देशात ठसवणाऱ्या भगव्या ध्वजाला आपल्या परंपरेत धार्मिक, आध्यात्मिक, सामरिक महत्त्व आहे. याच कारणांमुळे आमदार रोहित पवार यांनी स्वराज्य ध्वजाची संकल्पना साकारली आहे.
- जयश्री पवार, माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद
-----------------------
सप्तशृंगगडावर स्वराज्य ध्वज यात्रेचे स्वागत करून मिरवणुकीत सहभागी जयश्री पवार, अजय दुबे, संदीप वाघ, संदीप बेनके, राजेश गवळी आदी. (११ कळवण १)
110921\11nsk_18_11092021_13.jpg
११ कळवण १