मेशी : देवळा तालुक्यातील मटाणे येथील भूमिपुत्र व लष्करातील हवालदार शरद सहादू आहेर हे २० वर्ष प्रदीर्घ देशसेवेनंतर सेवानिवृत्त झाले. त्यांचे गावात रॅली काढून जंगी स्वागत करण्यात आले.सेवानिवृत्त हवालदार शरद आहेर हे २००२ मध्ये भारतीय सैन्यात दाखल झाले होते. नशिराबाद येथे त्यांची पहिली पोस्टिंग झाली होती. त्यांनी सुकणा, मेरठ येथेही सेवा बजावली. २०११ मध्ये युनायटेड नेशन (शांती सेना) लेबनानमध्ये निवड झाली. नागालँड, पुणे येथे सेवा बजावल्यानंतर तवंग येथून ते सेवानिवृत्त झाले. यानिमित्त देवळा शहरात भव्य स्वागत रॅली काढण्यात आली होती. यानंतर मटाणे येथे मूळगावी स्वागत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी विविध मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष केदा आहेर, महारोजगार केंद्र समन्वयक भाऊसाहेब पगार, नगरसेवक जितेंद्र अण्णा आहेर, अनिल आहेर, जिल्हा परिषद सदस्या नूतन आहेर, राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील आहेर, भाजप सैनिक आघाडीचे अध्यक्ष मांगू लोखंडे, संस्थापक रोशन आहेर, खजिनदार कैलास पगार, सदस्य किसन आहेर, महिंद्र आहेर, संदीप पाटील, भाऊसाहेब आहेर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
सेवानिवृत्त लष्करी जवानाचे मटाणे गावी जंगी स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2022 10:56 PM
मेशी : देवळा तालुक्यातील मटाणे येथील भूमिपुत्र व लष्करातील हवालदार शरद सहादू आहेर हे २० वर्ष प्रदीर्घ देशसेवेनंतर सेवानिवृत्त झाले. त्यांचे गावात रॅली काढून जंगी स्वागत करण्यात आले.
ठळक मुद्देमटाणे येथे मूळगावी स्वागत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.