नाशिक: संत शिरोमणी निवृत्तीनाथ महाराज यात्रा उत्सव निमित्ताने पंचायत समितीच्यावतीने शहरात दाखल झालेल्या दिंड्यांचे स्वागत करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते तसेच पंचायत समिती सभापती रत्नाकर चुंबळे यांच्या हस्ते दिंडींचे स्वागत करण्यात आले.संत शिरोमणी निवृत्तीनाथ महाराज यात्रा निमित्ताने दरवर्षी जिल्हा परिषद व नाशिक पंचायत समितीच्यावतीने दिंडींचे स्वागत करण्यात येते. यावर्षी देखील स्वागताबरोबरच त्यांना अल्पोपहार देण्यात आला. यासाठी पंचायत समितीच्या प्रांगणात मंडप उभारण्यात आला होता. सकाळी त्रंबकेश्वर रस्त्याने येणा-या सर्व दिंडींचे पंचायत समितीच्यावतीने स्वागत करण्यात आले. यावेळी गट विकास अधिकारी पांडुरंग कोल्हे, पंचायत समतिीचे पदाधिकारी, विविध विभागांचे खातेप्रमुख, कर्मचारी आदि उपस्थित होते