कंधाणे : सटाणा कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने आवारात विक्री झालेल्या शेतमालाचे पेमेंट (चुकवती) रोखीने करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे शेतकरी वर्गाने स्वागत केले आहेबागलाणच्या बळीराजाची अर्थ वाहिनी समजल्या जाणा-या कृषि उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणावर शेतमाल विक्रीसाठी आणला जातो. त्यात कांदा या मोठया प्रमाणात समावेश असतो. बागलाण परिसर कांदा पिकाचे आगार समजले जाते परंतु येथील व्यवहार रोखीने नसल्यामुळे अडचणीच्या काळात शेतक-यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. हयातच काही व्यापारी वर्गाने दिलेले धनादेश वेळेवर वटत नसल्याने शेतक-यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत होता. त्याबाबत शेतक-यांनी संचालक मंडळाकडे तक्ररींचा पाढा वाचला होता, परंतु त्यावर कोणताही ठोस निर्णय घेतला जात नव्हता. दरम्यान, नवनियुक्त संचालक मंडळाने गेल्या शुक्रवारी (दि.३) झालेल्या एकत्रित बैठकीत शेतकरी हिताचा निर्णय घेत ६ आॅगस्टपासून विक्री झालेल्या मालाचे रोखीने पेमेंट करण्याचा एकमताने निर्णय घेतला. हया निर्णयाचे शेतकरी वर्गाने स्वागत केले आहे. अनेक दिवसापासून प्रलंबित असलेली मागणी मंजूर झाल्याने शेतक-यांच्या चेह-यावर समाधान पसरले आहे.अडचणी असल्यास संपर्क करावाबाजार समितीच्या आवारात विक्री झालेल्या मालाचे रोखीने पेमेंट करण्याचा निर्णय झाला आहे. विक्री झालेल्या मालाचे शेतक-यांनी व्यापारी वर्गाकडून रोखीने पेमेंट घ्यावे. काही अडचणी असल्यास बाजार समितीच्या कार्यालयात संपर्क करावा- संजय बिरारी, संचालक,बाजार समिती
रोख पेमेंटच्या निर्णयाचे शेतक-यांकडून स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2018 4:17 PM
बागलाण : बाजार समितीने घेतला निर्णय
ठळक मुद्देबागलाणच्या बळीराजाची अर्थ वाहिनी समजल्या जाणा-या कृषि उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणावर शेतमाल विक्रीसाठी आणला जातोव्यवहार रोखीने नसल्यामुळे अडचणीच्या काळात शेतक-यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो