शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
2
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
5
सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
6
PM नरेंद्र मोदींचा जगात डंका; आता गयाना आणि बार्बाडोसकडून 'सर्वोच्च सन्मान' जाहीर!
7
Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते
8
अमेरिकेसारख्या देशांना कर्जावर नियंत्रण ठेवावं लागेल, आणीबाणीसारख्या परिस्थितीत.., रघुराम राजन यांचा इशारा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
10
"१०:३० वाजता मतदानाला गेले, फक्त तीनच लोक", रस्त्यांची दुरवस्था दाखवत बॉलिवूड अभिनेत्री म्हणते- "जर तुम्हाला..."
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: 1962 ते 2019... प्रत्येक निवडणुकीत अपक्षांनी किती मते खाल्ली?
12
कश्मिरा शाहची अपघातानंतर दिसली पहिली झलक, लांबलचक पोस्ट शेअर करत म्हणाली...
13
'धारावी प्रोजेक्ट'मध्ये अदानींना इंटरेस्टच नव्हता; शरद पवारांनी विषयच निकाली काढला
14
"मी यावेळी मतदान करु शकणार नाही...", मराठमोळ्या अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट
15
"पक्षापेक्षा जास्त उमेदवाराचा विचार!" मनवा नाईकने केलं मतदान, म्हणाली, "स्थिर सरकार..."
16
तुम्हाला माहितीये का, भारतात रस्त्यावर धावणाऱ्या सर्वाधिक ई-बसेस कोणत्या कंपनीच्या?
17
६ महिन्यांत 'या' शेअरमध्ये ५६५% ची वाढ; आता बोनस शेअर देण्याची तयारी, कोणता आहे स्टॉक?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
19
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
20
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...

हेल्मेट परिधान केलेल्या दुचाकीस्वारांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2019 2:16 PM

जायखेडा : शहरी भागापाठोपाठ शुक्रवारपासून आता ग्रामीण भागातही हेल्मेट सक्तीला प्रारंभ करण्यात आला असून, नियमांचे पालन करीत हेल्मेट परिधान केलेल्या दुचाकी स्वारांना प्रोत्साहित करण्यासाठी जायखेडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.

जायखेडा : शहरी भागापाठोपाठ शुक्रवारपासून आता ग्रामीण भागातही हेल्मेट सक्तीला प्रारंभ करण्यात आला असून, नियमांचे पालन करीत हेल्मेट परिधान केलेल्या दुचाकी स्वारांना प्रोत्साहित करण्यासाठी जायखेडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यांंविरोधात पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. जायखेडा पोलिसांनी आपल्या कार्यक्षेत्रातील ठिक ठिकाणच्या मुख्य रस्त्यांवर ही धडक मोहीम राबविली. ग्रामीण भागातील दुचाकी स्वारांकडून नियमांचे उल्लंघन करीत विना हेल्मेट सर्रास दुचाकी चालविल्या जातात. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढून जीवित हानी वाढली आहे. यामुळेच हेल्मेट सक्ती करण्यात येत आहे. पोलिसांकडून गेल्या काही दिवसांपासून आपल्या कार्यक्षेत्रात वाहतूकीचे नियम, शीट बेल्टचा व हेल्मेटचा वापर याबाबत भिंती पत्रके व हेल्मेट परिधान करून मोटारसायकल रॅली काढून जनजागृती करण्यात येत होती. या नियमांची आता काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार असून वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे, दुचाकी चालकांनी हेल्मेट केवळ सोबत न वागवता त्याचा प्रत्यक्ष वापर करावा व आपल्या जीविताचे संरक्षण करावे असे आवाहन करण्यात आले. या मोहिमेत पोलीस कर्मचारी गवळी,नेरकर, गायकवाड,भोये,थैल,माळी सहभागी झाले.

टॅग्स :Nashikनाशिक