नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात संचारबंदी लागू असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाशिक शहर पोलिसांनी संचलन केले. यावेळी परिसरातील नागरिकांनी पोलिसांवर फुलांचा वर्षावर करीत त्यांचे स्वागत केले. परिसरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यासह चौकाचौकांत नागरिकांनी पुष्पवृष्टी करीत टाळ्या वाजवून पोलिसांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. महाराष्ट्रात झपाट्याने प्रसार होत असलेल्या कोरोना व्हायरसचे बाधित रुग्ण वाढत असताना नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली असून, आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांबरोबरच पोलीस कर्मचारीही दिवस-रात्र काम करीत आहे. संचारबंदीच्या या काळात नागरिकांनी नियमांची अंमलबजावणी करावी या उद्देशाने शुक्रवारी (दि.२४) रोजी इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिंगळे चौक येथून पोलिसांच्या संचलनास सुरुवात झाल्यानंतर चार्वाक चौक, मोदकेश्वर चौक, गजानन महाराज मंदिर, बापू बंगला, परबनगर, रथचक्र चौक, राजसारथी सोसायटी, कलानगर आदी मार्गांनी संचलन करण्यात आले. याप्रसंगी सहायक पोलीस उपायुक्त मंगलसिंग सूर्यवंशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर, कुमार चौधरी, पांडुरंग पाटील यांच्यासह अधिकारी व कर्मचारी संचलनात सहभागी झाले होते. त्यांचे मनपा सभागृहनेता सतीश सोनवणे, आरोग्य सभापती डॉ. दीपाली कुलकर्णी, नगरसेवक चंद्रकांत खोडे, अॅड. श्याम बडोदे, सुप्रिया खोडे, सुदाम डेमसे, भगवान दोंदे, संगीता जाधव, पुष्पा आव्हाड, सुनील खोडे, अॅड. भानुदास शौचे यांच्यासह परिसरातील विविध मंडळांनी व सामाजिक संस्थांनी स्वागत केले. दरम्यान, सचिन जेजूरकर या शेतकºयाने पोलिसांवर पुष्पवृष्टीसाठी गुलाबाची फुले उपलब्ध करून दिली होती.
नाशकात पुष्पवृष्टी करून पोलीस संचलनाचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 6:05 PM
नाशिक शहरात संचारबंदी लागू असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाशिक शहर पोलिसांनी संचलन केले. यावेळी परिसरातील नागरिकांनी पोलिसांवर फुलांचा वर्षावर करीत त्यांचे स्वागत केले.
ठळक मुद्देइंदिरानगर परिसरात पोलिसांवर फुलांचा वर्षावपोलीस संचलनाचे पुष्पवृष्टी करून स्वागत