नाशिक : नाशिक वनवृत्तामधील उपविभाग मालेगावच्या वनक्षेत्रावर सहा महिन्यांपासून खैर तस्करांच्या टोळ्या सक्रिय असून, सुमारे चारशेहून अधिक खैरची झाडे कापून नेल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला. यानंतर वनविभाग खडबडून जागे झाले असून, दक्षता पथकामार्फत स्वतंत्र चौकशीचे आदेश मुख्य वनसंरक्षक एस.रामाराव यांनी दिले. या ‘रॅकेट’मध्ये सहभागी दोषी अधिकारी व कर्मचाºयांविरुद्ध कारवाईचे संकेत त्यांनी दिले आहे.गाळणा, नागझरी-शितेवाडी वनक्षेत्रावर खैर तस्कर टोळीने वृक्षतोड केल्याचे सोमवारी (दि.१०) उघडकीस आले. या गैरप्रकाराची वनवृत्त विभागाचे मुख्य वनसंरक्षक एस. रामाराव यांनी गंभीर दखल घेतली आहे. दोनशेपेक्षा अधिक खैरची झाडे कापल्याचे पंचनाम्यात समोर आले असून, अज्ञात गुन्हेगारांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच या गैरप्रकारात उपवनविभागाच्या हद्दीमधील काही अधिकारी व कर्मचाºयांचा दुर्लक्षितपणा कारणीभूत आहे का? या दिशेनेही चौकशी सुरू करण्यात आली असून, दोषी अधिकारी-कर्मचाºयांसह गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे रामाराव यांनी स्पष्ट केले आहे. महाराष्टÑ-गुजरात सीमेवरील नाशिकच्या आदिवासी भागातील जंगलात धुमाकूळ घालणाºया खैर तस्करांच्या टोळीचे हात थेट मालेगावच्या वनहद्दीपर्यंत येऊन पोहचल्याने धोका वाढला असून, वनविभागापुढे तस्करांच्या मुसक्या आवळण्याचे मोठे आव्हान असल्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने मंगळवारी प्रसिद्ध केले. मालेगाव तालुक्यातील सॉमिलदेखील संशयाच्या भोवºयात आहे.
दक्षता पथकातर्फे खैर जंगलतोडची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 12:34 AM