येवला : वाढत्या उन्हाच्या चटक्यांबरोबरच तालुक्यातील उत्तर-पूर्व भागाला पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे. साठवण बंधारे आणि विहिरीतील जलस्त्रोत तळ गाठत आहे. त्यामुळे माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत असतांनाच पशुधनाच्या चारा-पाण्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.डोंगराळ व कायमच दुष्काळी भाग म्हणून उत्तर-पूर्वभागाची ओळख आहे. दरवर्षी एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांमध्ये परिसरातील महिला व तरूणांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते. माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत असल्याने पशुधनाची पाण्यासाठी मोठी वणवण होते. ममदापूर येथील गावालगत असलेला गावठाण बंधारा व विहीरींनी तळ गाठला असून पिण्याच्या पाण्यासाठी ममदापूरवासियांना भटकंती करावी लागणार असल्याचे चित्र आहे. बहुतांशी शेतकरी, सामान्य माणसेही चारा पाण्यासाठी बाहेरगावी जाणे पसंत करतात. परंतु यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन व संचारबंदी असल्याने बाहेरगावी जाणे शक्य नसल्याने पशुधन सांभाळण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. परिसरातील प्रलंबित सिंचनाचे प्रकल्प तातडीने शासनाने मार्गी लावावे, अशी मागणी सामाजीक कार्यकर्ते प्रकाश जानराव यांनी केली आहे.
विहिरींनी तळ गाठल्याने चारा-पाण्याचा प्रश्न ऐरणीवर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2020 4:23 PM
वाढत्या उन्हाच्या चटक्यांबरोबरच तालुक्यातील उत्तर-पूर्व भागाला पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे. साठवण बंधारे आणि विहिरीतील जलस्त्रोत तळ गाठत आहे. त्यामुळे माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत असतांनाच पशुधनाच्या चारा-पाण्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
ठळक मुद्दे येवला : उत्तर- पूर्व भागाला पाणीटंचाईची झळ