ठाणगाव : सिन्नर तालुक्याचे कोकण म्हणून ओळख असलेल्या ठाणगाव परिसरात पावसाची जोरदार प्रतीक्षा कायम असून शेतऱ्यांची आभाळाकडे नजर लावून आहे.पावसाच्या हलक्या सरी येत असल्या तरी पेरणीसाठी पुरेसा पाऊस नसल्याने शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतिक्षेत आहे. शेतकऱ्यांनी बि-बियाण्यांची खरेदी केली असून जमीनीची मशागत करून ठेवली आहे. परंतु, पावसाचे उशीरा आगमन झाल्याने व पावसाचे प्रमाण कमी असल्याने पेरण्यांना विलंब होत आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकरी रोपे तयार करून जोरदार पाऊस येण्याच्या प्रतिक्षेत आहे.
पश्चिम पट्ट्यात जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 5:39 PM