लोकमत न्यूज नेटवर्कजायखेडा : तुकाराम बीजनिमित्त पंढरपूरहून देहूला निघालेल्या जायखेडा, ता. बागलाण येथील दिंडीतील वारकऱ्यांना मद्यपान केलेल्या पाच ते सहा जणांनी शिवीगाळ करीत दगडाने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार खडकी (पुणे) येथे घडला. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत असून, हल हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी कृष्णाई प्रतिष्ठान व परिसरातील वारकरी बांधवांकडून करण्यात येत आहे. ही घटना मंगळवारी (दि. १०) दुपारी १ वाजता खडकी येथे घडली. याप्रकरणी खडकी पोलिसांकडे तक्र ार अर्ज देण्यात आला आहे.दरवर्षाप्रमाणे यंदाही तुकाराम बीजनिमित्त पंढरपूर ते देहू पायी दिंडी निघाली होती. या दिंडीमध्ये जायखेडा येथील वै. कृष्णाजी माउलींच्या शिष्यांसह ९५० वारकरी सहभागी झाले होते.या घटनेची माहिती काही वारकºयांनी जायखेडा येथील मूळ रहिवासी व पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार गोसावी यांना मोबाइलद्वारे कळवताच त्यांनी तातडीने वरिष्ठ पोलीस अधिकाºयांशी संपर्क साधून पोलिसांची मदत मिळून दिली. त्यानंतर कडेकोट बंदोबस्तात दिंडी देहूकडे रवाना करण्यातआली.या प्रकरणातील गुंड फरार झाले असून, या घटनेचा सर्व स्तरातून निषेध करण्यात येत आहे. या प्रकरणी धनंजय महाजन, केशव सोनवणे, शशिकांत बच्छाव, नानाजी बच्छाव, निवृत्ती अहिरे, यशवंत गांगुर्डे, अनिल अहिरे, रवींद्र अहिरे, गंगाराम चव्हाण, भूषण बोरसे, धनंजय अहिरे, विष्णू घुले, संजय देवरे, सुनील जगताप यांच्यासह १५ वारकºयांनी पोलिसात तक्रार दिली आहे. गुंडांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.तुकाराम बीजनिमित्त ह.भ.प. कृष्णाजी माउली यांच्या काळापासून हा पायी दिंडी सोहळा सुरू आहे. या दिंडीचे वैशिष्ट्ये म्हणजे फक्त पाचच दिवसात पंढरपूर ते देहू असे ३५० किलोमीटर अंतर पार करावे लागते. म्हणजे दिवसाला सरासरी ७० किलोमीटर अंतर पायी चालावे लागते. परंपरेप्रमाणे सदर सोहळा चालत आलेला आहे. मंगळवारी खडकी बाजार, पुणे येथे काही समाजकंटकांनी दारूच्या नशेत वारकºयांवर हल्ला केला व मारहाण केली. या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत. येथून पुढे असे प्रकार वारकरी संप्रदाय सहन करणार नाही. आरोपींना लवकरात लवकर अटक करून पोलिसांनी कडक कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय स्वस्थ बसणार नाही. यापुढे सदर पायी दिंडी सोहळ्यासाठी पुणे पोलिसांनी दिंडीसोबत बंदोबस्त द्यावा.- नंदकुमार गोसावी, सामाजिक कार्यकर्तेमद्यपींकडून प्रकारमंगळवारी दुपारी १ वाजता ही दिंडी खडकीतील किर्लोस्कर कंपनीजवळील ब्राउन चेरी येथे पोहोचली. त्यावेळी मद्यपान केलेल्या पाच जणांनी वारकºयांना शिवीगाळ करीत त्यांच्यावर दारूच्या बाटल्या फेकल्या व१८ ते २० वारकºयांना त्यांनी काठीने व दगडाने मारहाण करण्याचा प्रयत्न केला.
जायखेड्याच्या वारकऱ्यांना पुुण्यात मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 11:02 PM
जायखेडा : तुकाराम बीजनिमित्त पंढरपूरहून देहूला निघालेल्या जायखेडा, ता. बागलाण येथील दिंडीतील वारकऱ्यांना मद्यपान केलेल्या पाच ते सहा जणांनी शिवीगाळ करीत दगडाने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार खडकी (पुणे) येथे घडला. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत असून, हल हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी कृष्णाई प्रतिष्ठान व परिसरातील वारकरी बांधवांकडून करण्यात येत आहे. ही घटना मंगळवारी (दि. १०) दुपारी १ वाजता खडकी येथे घडली. याप्रकरणी खडकी पोलिसांकडे तक्र ार अर्ज देण्यात आला आहे.
ठळक मुद्दे१८ ते २० वारकºयांना त्यांनी काठीने व दगडाने मारहाण करण्याचा प्रयत्न