लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : कोरोना संसर्ग काळात आॅनलाइन शिक्षणाची सर्वच सोशल माध्यमावर वावटळ उठली असून, ज्या ग्रामीण, कष्टकरी, मजूर, कामगार, डोंगराळ-दुर्गम भागात इंटरनेट अथवा सोशल मीडिया पोहचू शकत नाही, आर्थिक स्थितीमुळे ज्या पालक-विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन नाहीत, ना इतर आधुनिक माध्यमे त्या आॅफलाइन पालक-विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे काय? असा सवाल अध्यापकभारतीचे संस्थापक शरद शेजवळ यांनी केंद्र व महाराष्ट्र सरकार तसेच संबंधितांना पाठविलेल्या निवेदनात केला आहे.आधुनिक तंत्रज्ञान साधन सुविधा ज्या भागात नाहीत आणि डिजिटल शिक्षणाच्या अध्ययन अध्यापनातील मर्यादा लक्षात घेऊन ज्या ठिकाणी पालक डिजिटल शिक्षण सुविधांपासून दूर आहेत अशा ठिकाणी शिक्षक, विद्यार्थी व शिक्षणप्रेमी व्यक्ती, संस्था, संघटनांच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर शिक्षक, पालक व उच्चशिक्षित तरु ण-तरु णींनी आपल्या गाव, वाडे, वस्ती, तांड्यावर जाऊन कोरोना संसर्गाची शारीरिक अंतर व इतर आरोग्याच्या दक्षता घेत अध्यापन करता येईल का याचा विचार करावा असे आवाहन राष्ट्रीय बालक-विद्यार्थी, पालक, शिक्षक-शिक्षण-प्रशिक्षण संस्था अध्यापकभारतीने सदर निवेदनात केले आहे.कोरोना संसर्ग काळात सर्वदूर डिजिटल आॅनलाइन शिक्षणाच्या चर्चा जोरात असून, अशा साधन सुविधा नसलेले विद्यार्थी व त्यांचे पालक मानसिक तणावात येत आहेत. अशा वेळी महाराष्ट्र शासनाचा शिक्षण विभाग, शिक्षण संस्था व शिक्षक-विद्यार्थी संस्था संघटनांनी डिजिटल साधनापासून दूर-दुर्लक्षित, वंचित गरीब-ग्रामीण-कष्टकरी विद्यार्थी-पालक यांना हार्ड कॉपी प्रकारात अध्ययन-अध्यापन साहित्य आॅफलाइन विद्यार्थ्यांना पुरविता येईल असे प्रयत्न महाराष्ट्र शासन, शिक्षण-शिक्षक-विद्यार्थी, सामाजिक संघटना-संस्था यांना राष्ट्रीय बालक, पालक, शिक्षक प्रशिक्षण संस्था अध्यापकभारतीचे संस्थापक शरद शेजवळ यांनी केले आहे.निवेदनावर प्रा. अमित बनकर, शैलेंद्र वाघ, वनिता सरोदे, संतोष बुरंगे, प्रा. के. सी. केवट, प्रा. विनोद पानसरे, मिलिंद पगारे, महेंद्र गायकवाड, अमिन शेख, बाबासाहेब गोविंद, मिलिंद गुंजाळ, प्रा. मिलिंद गांगुर्डे, प्रफुल्ल वाहुळ, दीपक शिंदे, प्रा. सुवर्णा पगारे, सचिन शिराळ, अतुल डांगळे, विशाल बर्वे, सुरेश लोखंडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
आॅफलाइन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे काय ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 4:41 PM
लोकमत न्यूज नेटवर्क येवला : कोरोना संसर्ग काळात आॅनलाइन शिक्षणाची सर्वच सोशल माध्यमावर वावटळ उठली असून, ज्या ग्रामीण, कष्टकरी, मजूर, कामगार, डोंगराळ-दुर्गम भागात इंटरनेट अथवा सोशल मीडिया पोहचू शकत नाही, आर्थिक स्थितीमुळे ज्या पालक-विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन नाहीत, ना इतर आधुनिक माध्यमे त्या आॅफलाइन पालक-विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे काय? असा सवाल अध्यापकभारतीचे संस्थापक शरद शेजवळ यांनी केंद्र व महाराष्ट्र सरकार तसेच संबंधितांना पाठविलेल्या निवेदनात केला आहे.
ठळक मुद्दे अध्यापकभारतीचा सवाल : कोरोना संसर्ग काळात सोशल माध्यमावर वावटळ