शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
3
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
4
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
6
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
7
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
8
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
10
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
11
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
13
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
14
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
15
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
16
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
17
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
18
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
19
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
20
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले

शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये चाललं तरी काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 12:22 AM

शहर व ग्रामीण पोलीस दलाच्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये चाललयं तरी काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. लागोपाठ दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह सहायक उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना लाचेची रक्कम घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना रंगेहाथ ताब्यात घेतले.

नाशिक : शहर व ग्रामीण पोलीस दलाच्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये चाललयं तरी काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. लागोपाठ दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह सहायक उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना लाचेची रक्कम घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना रंगेहाथ ताब्यात घेतले.पोलीस ठाण्यांचा कारभार सुधारावा यासाठी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी सूत्रे स्वीकारताच पोलीस ठाण्यांना भेटी देण्यास सुरुवात केली होती. जेणेकरून पोलीस ठाण्यांमधील अधिकारी-कर्मचाºयांवर वचक निर्माण होईल.आयुक्तालयातील संवेदनशील पोलीस ठाण्यांपैकी पंचवटी पोलीस ठाण्यापासून नांगरे-पाटील यांनी पोलीस ठाण्यांच्या कारभार पाहणीला सुरुवात केली होती. पोलीस ठाण्यांमधील कारभार सुधारावा यासाठी सिंह यांनीही वारंवार वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षकांच्या बैठका घेतल्या. तालुका पोलीस ठाण्याला वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची नेमणूक होऊन काही महिनेच होत नाही तोच येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक नानासाहेब रामकिशन नागदरे, सहायक उपनिरीक्षक सुभाष हरी देवरे यांना तालुका पोलीस ठाण्यातील कक्षात लाचेची २२ हजारांची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी (दि.५) ताब्यात घेतले.तसेच शुक्रवारी (दि.६) सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनाही ५० हजार रुपयांची लाच घेताना ताब्यात घेतले. जाधव हे तिसºयांदा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकले. एकूणच पोलीस ठाणेप्रमुखांकडूनच विविध गुन्ह्यांमध्ये तडजोड करण्यासाठी संशयितांकडून थेट लाचेची मागणी होऊ लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यांमध्ये नेमके चालले तरी काय? असा प्रश्न सर्वसामान्य नाशिककरांकडून उपस्थित होऊ लागला आहे.भ्रष्टाचार संपविण्याचे आव्हानपोलीस ठाण्यांमधील अधिकाºयांना लागणारी भ्रष्टाचाराची कीड वेळीच संपविण्याचे आव्हान आयुक्तालय, अधीक्षक कार्यालयांच्या प्रमुखांपुढे उभे राहिले आहे. ग्रामीण पोलीस दलाच्या तालुका पोलीस ठाणे आणि आयुक्तालयातील सातपूर पोलीस ठाण्यांपासून भ्रष्टाचाराची कीड लागण्याससुरुवात झाली आहे. यामुळे नांगरे-पाटील व सिंह यांना वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ‘फवारणी’ करावी लागणार आहे, हे निश्चित.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय