- देवराम भुसारे, व्यवस्थापक, नाशिक मर्चंट बँक शाखा, पेठ
बँक व्यवस्था ही ‘अत्यावश्यक सेवेत’ असल्यामुळे कोरोनाच्या महामारीतदेखील सेवा सुरू आहे. नवीन आर्थिक वर्ष एप्रिलपासून सुरू होते, त्यामुळे शेती, गृह, गोल्ड, व्यवसाय, वाहन या सर्व कर्जाची परतफेड सुरू असते. त्यामुळे बँक शासकीय सुट्ट्या वगळता एकही दिवस बंद ठेवता येत नाही, मोठ्या प्रमाणात ग्राहक येत असतात. शासनाने निश्चित केलेल्या नियमांनुसार कमी संख्या आतमध्ये बोलावून व सॅनिटायझर करून त्यांना आत घेतले जाते. ग्राहकसुद्धा सहकार्य करतात तरीही मनात भीती मात्र कायम आहे.
- श्रीधर जावेर, व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा, सायखेडा
बँकांमध्ये पैसे काढायला गेले तर येणाऱ्यापैकी केवळ पाचच जणांना आत प्रवेश देण्यात येतो शिवाय मध्ये गेल्यावर अंतर ठेवण्यात येते. त्यामुळे तासन् तास थांबावे लागते. त्यामुळे पैसे काढायचा पण कंटाळा येतो. एटीएममध्येसुद्धा गर्दी राहते. त्यामुळे आता या संचारबंदी आणि कोरोनाचा वैताग आला आहे.
- देवा शिंदे, कळवण
पेन्शन आणि कामानिमित्त बँकेत जावे लागते. एटीएम आणि ऑनलाईन बँकिंग सुविधा वापरता येत नसल्याने प्रत्यक्ष बँकेत आर्थिक व्यवहार करण्यासाठी जावे लागते. अनेकवेळा बँक ऑफ महाराष्ट्रच्या सायखेडा शाखेत गर्दी असते. बाहेर रांगा लावलेल्या असतात. कितीही काळजी घेत असले तरी मनात भीती कायम आहे. तत्काळ सेवा मिळण्यासाठी कर्मचारी संख्या वाढवून गर्दी टाळली पाहिजे.
- कारभारी खालकर, पेन्शनधारक, औरंगपूर
कोरोनाकाळात सर्वत्र व्यवहार ठप्प असल्याने बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. ग्राहकांकडून बँकेत कोरोनाचे नियम न पाळल्याने संसर्ग होण्याची शक्यता असते तसेच अनेकदा एटीएममध्ये रक्कम नसल्याने बँकेत जावे लागते. तेथेही गर्दी होत असल्याने तासन्-तास थांबावे लागते. परिसरातील बँक खातेदारांची गर्दी होत असल्याने त्रास सहन करावा लागतो.
- रामदास सानप, खातेदार, नांदूरशिंगोटे