सुदर्शन सारडाओझर : निफाडच्या पंचायत समितीमध्ये बुधवारी झालेल्या सभापती, उपसभापती निवडीत शिवसेना-भाजपची युती घडून आल्याने जिल्ह्याच्या राजकारणात शिग्रपटलावर असलेल्या निफाड मध्ये कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून शिवसेना व राष्ट्रवादी हेच राहणार असल्याचे सिद्ध होऊन गेले आहे. सभापती म्हणून सेनेच्या रत्ना संगमनेरे तर उपसभापतीपदी विंचूर गणाचे भाजपचे सदस्य संजय शेवाळे बिनविरोध निवडून आले आहे.एकूण वीस सदस्यांचे संख्याबळ असलेल्या निफाड पंचायत समतिीत शिवसेनेचे सर्वाधिक दहा, राष्ट्रवादीचे पाच, अपक्ष तीन तर भाजपचे दोन सदस्य आहेत.बहुमताच्या आकडा गाठायचा म्हटला तर अकरा सदस्य लागतात.त्यात बुधवारी निवड प्रक्रि येसाठी विशेष बैठक तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी बोलवली. वीसपैकी केवळ चौदाच सदस्य उपस्थित होते. त्यात सेना भाजपचे बारा तर राष्ट्रवादीच्या दोघांचा समावेश होता. राज्यात भाजपला बाजूला करायला देशाचे नेते शरद पवार आण िमुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काँग्रेसला सोबत घेऊन एकत्र आले. उद्धिष्ट एकच की भाजप कसा लांब राहिल. परंतु नाशिकच्या राजकारणात अनेक अध्याय रचलेल्या निफाडच्या राजकारणात कधी सुलतानी संकट येईल हे कुणीही सांगू शकत नाही. परंतु सुरवातीपासूनच शेवाळे शिवसेनेबरोबर असल्याने त्यांना त्याची परतफेड मिळाल्याची प्रतिक्रि या उमटली. परंतु मागील निवडीत महाविकास आघाडी साकारलेल्या निफाडमध्ये यंदा राष्ट्रवादीने नेमकी तटस्थ भूमिका का घेतली हा मुख्य प्रश्न उपस्थित होत आहे. त्यांच्या एका सदस्यला संपर्क केला असता वरिष्ठ नेत्यांनी आजच्या निवडणुकीत तटस्थ राहण्याचे आदेश दिल्याचे सांगितले. खरे म्हणजे संजय शेवाळे यांना मित्रत्वाची अनोखी भेट मिळणार हे राष्ट्रवादीच्या सदस्यांना आधीपासून माहीत असताना देखील त्यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळून गुलाल अंगावर घेतला असता तर काय बिघडले असते? परंतु कुणाचाही ताळमेळ नसल्याचा अनुभव या निवडणुकीत पुन्हा दिसून आलाज तालुक्यात भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेशबाबा पाटलांचा गट सोडला तर दुसरा गट आत्मियता बदलण्यात माहिर आहे हे जनतेला आमदारकीच्या निवडणुकीत माहीत होऊन गेले. म्हणूनच विधानसभेला कुंदेवाडीत शिवसेनेला आघाडी मिळाली हे ही तितकेच खरे. इतरत्र मात्र काही पदाधिकारी भाजपचे वरिष्ठ नेत्यांच्या अर्थपूर्ण आदेशामुळे शिट्टी वाजवत सुटले होते.
राष्ट्रवादी कॉंग्रेसची तटस्थ भूमिका काय दर्शवते?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 11:36 PM
ओझर : निफाडच्या पंचायत समितीमध्ये बुधवारी झालेल्या सभापती, उपसभापती निवडीत शिवसेना-भाजपची युती घडून आल्याने जिल्ह्याच्या राजकारणात शिग्रपटलावर असलेल्या निफाड मध्ये कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून शिवसेना व राष्ट्रवादी हेच राहणार असल्याचे सिद्ध होऊन गेले आहे. सभापती म्हणून सेनेच्या रत्ना संगमनेरे तर उपसभापतीपदी विंचूर गणाचे भाजपचे सदस्य संजय शेवाळे बिनविरोध निवडून आले आहे.
ठळक मुद्देनिवडणूक : निफाड पंचायत समितीत शिवसेना-भाजपायुतीने संभ्रम