ठळक मुद्देएका मुलीकडे तिच्या खिशात ड्रग्ज सापडल्याने त्याचा तपास (इन्वेस्टीकेशन) करणे आवश्यक आहे.
इगतपुरी : मंगळवारी (दि.२९) सायंकाळी चार वाजेच्या दरम्यात रेव्ह पार्टीतील २५ आरोपींना न्यायालयात जामिनासाठी हजर केले असता सरकारी वकील यांचा युक्तिवाद झाला.
या वेळी सरकारी वकिलांनी दुसऱ्या केसमध्ये आरोपीकडून (कोकेन) सापडलेले होते. त्यांचा या केसमध्ये सहभाग आरोपींशी असु शकतो. तसेच एका मुलीकडे तिच्या खिशात ड्रग्ज सापडल्याने त्याचा तपास (इन्वेस्टीकेशन) करणे आवश्यक आहे. तर एक आरोपीकडून डिव्हिअर जप्त केला होता. त्याचा अनेल्स करणे आवश्यक आहे. यामध्ये हुक्का, चरस, गांजा, दारू कुठून कॅरी करण्यात आले, ट्रान्स्पोटेशन कसे केले, कुणाच्या सांगण्यावर आणून दिले ? असा कोर्टापुढे युक्तिवाद मांडला. यावेळी न्यायालयाने सोमवार पर्यंत (दि.५) पोलीस कोठडी सुनावली.