पाटोदा :परतीच्या पावसाने येवला तालुक्यातील संपूर्ण खरीप हंगामाचे नुकसान झाले असून प्रशासनाच्या वतीने १२४ गावांमधील नुकसानग्रस्त सुमारे चाळीस हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्राचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहे.शासनाच्या वतीने पंचनामे करण्यात आले. मात्र मदतीचे काय? असा सवाल शेतकº्यांच्या वतीने विचारला जात आहे.पावसाने कायम सातत्य ठेवल्याने खरीप हंगाम व पर्यायाने पिके चांगली आल्याने शेतकरी वर्ग आनंदात असतानाच ऐन कापणी,मळणीच्या दिवसातच परतीच्या परतीच्या पावसाने तेवीस दिवस हजेरी लावल्याने तालुक्यातील संपूर्ण शेती जलमय झाली.संपूर्ण पिके गुडघाभर पाण्यात काही दिवस तरंगत राहिल्याने हि पिके पाण्यात आडवी होऊन संपूर्णता सडून गेली..शेतकरी वर्गाने या पिकांसाठी एकरी पंचवीस हजारापेक्षा जास्त खर्च केला आह. हा संपूर्ण खर्च वाया गेला आहे.या पावसाने सोंगणी,केलेली मका,सोयाबीन ,बाजरी,भुईमूग आदि पिके या पावसाच्या कचाट्यात सापडली आहेत. मका व बाजरी या पिकांचा चाराही या पावसाने सडून गेल्याने पुढील काळात जनावरांच्या चाº्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याने शेतकरी वर्गापुढे पुढील काळात जनावरांना वैरण कशी निर्माण करावी हि चिंता लागून आहे. येवला तालुक्यात मोठया प्रमाणात द्राक्ष.डाळिंब बागा असून त्यांनाही या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.येवला तालुक्यात सर्वाधिक नगदी पिक म्हणून कांदा उत्पादन घेतले जाते. या अवकाळी पावसाने कांद्यासह कांदा रोपे संपूर्णता सडून गेल्याने आर्थिक गणित कोलमडून पडले आहे.कांदा पिका साठी शेतकऱ्यांचा एकरी पन्नास ते साठ हजार रु पये खर्च झाला आहे.