शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

दळवटला आगीत गहू खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 12:36 AM

कळवण : तालुक्यातील दळवट येथील वीजपुरवठा करणाऱ्या वीज तारा जीर्ण झाल्याने तुटू लागल्या असून शनिवारी दुपारी शासकीय गोदामाजवळ जीर्ण झालेली तार तुटल्याने विश्वनाथ भोये यांच्या शेतात उभा असलेला गहू जळून खाक झाला त्यांचे सुमारे ५० हजारांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देवीजवाहक तार पडली जीर्ण झालेल्या वीजवाहक तारा बदलण्याची मागणी

कळवण : तालुक्यातील दळवट येथील वीजपुरवठा करणाऱ्या वीज तारा जीर्ण झाल्याने तुटू लागल्या असून शनिवारी दुपारी शासकीय गोदामाजवळ जीर्ण झालेली तार तुटल्याने विश्वनाथ भोये यांच्या शेतात उभा असलेला गहू जळून खाक झाला त्यांचे सुमारे ५० हजारांचे नुकसान झाले आहे. भर दुपारी १ ते २ वाजेच्या दरम्यान शेतावरु न जाणारी जीर्ण झालेली एक तारा पडल्यामुळे शेतात काढणीसाठी आलेल्या गव्हाने पेट घेतला. या आगीत एकरभर गहू जळून खाक झाल्याचे सरपंच रमेश पवार यांनी सांगितले. आजूबाजूच्या शेतात काम करणाºया आदीवासी शेतकरी बांधवांनी शेतात धाव घेऊन गव्हाला लागलेली आग विझविल्यामुळे शेतालगत असलेल्या दहा ते बारा एकरातील उभ्या गव्हाचे संभाव्य नुकसान टळाले. वीज वितरण कंपनीने व शासकीय यंत्रणेने अकस्मात घडलेल्या घटनेचा पंचनामा करून नुकसानभरपाई देऊन आदिवासी शेतकºयास दिलासा द्यावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनी केली आहे. कळवण तालुक्यात दळवट व परिसरात सन १९७८ मध्ये वीज पुरवठा करण्यासाठी टाकण्यात आलेल्या तारा आता जीर्ण झाल्याने तुटत असल्याचे दळवट ग्रामपंचायतने वीज वितरण कंपनीला वेळोवेळी निवेदन देऊन कळविले आहे. वीज तारा बदलण्याची मागणी केली होती; मात्र त्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने हा प्रसंग घडल्याचे आदिवासी बांधवांनी सांगितले. ग्रामीण व आदीवासी भागात वीज वितरण कंपनीचे वीज तारांचे पसरलेले जाळे हे आता जीवघेणे ठरत आहे. लोंबकळणाºया तारांमुळे दरवर्षी शेतातील पिकांचे नुकसान होत आहे महावितरण कंपनीने कळवण तालुक्यातील वीज वितरण समस्यांचे सर्वेक्षण करून जीर्ण तारा, पोल बदलावे अशी मागणी नितीन पवार यांनी केली आहे. वीजवितरण कंपनीने पाऊले उचलावीतवीजपुरवठा जोडणी करण्यासाठी शेतातून तारा ओढलेल्या आहेत. त्या तारा जीर्ण झाल्यामुळे शॉर्टसर्किटमुळे आग लागून शेतातील पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याने तारा बदलण्यासाठी वीज वितरण कंपनी पाऊले उचलावीत अशी मागणी नितीन पवार यांनी केली आहे.