पाटोदा : परिसरात सततच्या बदलत्या वातावरणाने शेतकरी वर्ग हैराण झाला आहे. शनिवार व रविवारी दिवसभर हवेत गारवा व वाºयाने शेतकऱ्यांना दिवसभर हुडहुडी भरत होती तर सोमवारी मोठया प्रमाणात ढगाळ पावसाळी वातावरण निर्माण झाले होते. या ढगाळ वातावरणामुळे दुपारी दोन वाजेपर्यंत सूर्यदर्शन देखील झाले नाही.या बदलत्या वातावरणामुळे कांदा ,गहू, हरभरा,व भाजीपाला पिकांवर विपरीत परिणाम होत आहे.तर द्राक्ष पिकावर डावणी व मिलीबगचा प्रादुर्भाव वाढल्याने औषध फवारणी करण्यासाठी शेतकरी वर्गाला धावपळ करावी लागत आहे.दोन दिवस सुरु असलेल्या गार वाºयाने ओंब्या व धान्य भरलेला गहू आडवा झाल्याने शेतकºयांचे नुकसान होत आहे.थंडी रब्बी हंगामातील पिकांना पोषक असल्याने या थंडीने पिके वाढीला लागले मात्र ढगाळ हवामानामुळे पुन्हा पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे.या रोजच्या बदलणार्या वातावरणाचा पिकांवर परिणाम होत असल्याने शेतकरी वैतागला आहे.----------------------तीन दिवसांपासून दिवसभर गार वाºयाची झुळूक येत असून या वाºयाने ओंबी निघालेला गहू आडवा पडला असल्याने नुकसान झाले आहे. ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील पिके मोठया प्रमाणात रोगाला बळी पडत असल्याने औषध फवारणी करावी लागत आहे .-गोरख बोराडे, शेतकरी, पाटोदा
वाऱ्यामुळे गव्हाचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 1:00 PM