शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत अजून गोंधळात गोंधळ, २३ मतदारसंघांत उमेदवारच नाही; अर्ज भरायला दोनच दिवस शिल्लक
2
काँग्रेसने औरंगाबाद पूर्व, अंधेरी पश्चिमचे उमेदवार बदलले; विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर
3
कर्जाच्या तणावातून आईची हत्या; आत्महत्येचा प्रयत्न, वरळीतील घटना
4
नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या! हमास हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ कार्यक्रमात आंदोलकांच्या घोषणा
5
रेल्वेत जागा पकडण्यासाठी उडाली झुंबड, मुंबईत चेंगराचेंगरी; १० जखमी, दोन गंभीर
6
​​​​​​​देशातील शहरे झाली गॅस चेंबर, ११ शहरांतील हवा धोकादायक
7
Maharashtra Election 2024: "...पण काही लोकांबद्दल मला दुःखही आहे", फडणवीस असं का म्हणाले?
8
महायुतीच्या जागावाटपात रिपब्लिकन पक्ष अद्यापही वेटिंगवरच; आठवले नाराज, फडणवीसांनी दिला मोठा शब्द
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत मानसिंगराव नाईक की सत्यजित देशमुख, कोण मारणार बाजी? महाडिक बंडखोरीच्या तयारीत
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, मविआ'ला खोचक टोलाही लगावला
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : इंडिया आघाडीमध्ये फूट? विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव उमेदवार उभे करणार; महाविकास आघाडीच्या अडचणी वाढणार
12
Maharashtra Election 2024: शरद पवार- एकनाथ शिंदेंच्या 'या' उमेदवारांनी घेतली जरांगेंची भेट
13
अर्ज भरण्यासाठी उरले फक्त 2 दिवस; महायुती-मविआत जागावाटपाचा तिढा कायम...
14
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
15
युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
17
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
18
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
19
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
20
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा

अपंग, वृद्धांना रामकुंडावर व्हीलचेअरचा आधार

By admin | Published: September 19, 2015 10:46 PM

अपंग, वृद्धांना रामकुंडावर व्हीलचेअरचा आधार

नाशिक : साधुग्राममधील श्रीमद्विष्णूस्वामी वल्लभाचार्य नगरचे षष्ठपीठाधिश्वर गोस्वामी वल्लभरायजी महाराज यांच्या भक्तांनी शाही पर्वणी काळात शाहीस्नानासाठी येणाऱ्या अपंग, वृद्ध भाविकांना व्हीलचेअरचा आधार दिला. त्यामाध्यमातून सदर भाविकांना शाहीस्नानाचा मार्ग रामकुंडावर सुकर करून दिला. पर्वणी काळात विविध सामाजिक संस्थांनी भाविकांसाठी अनेक उपक्रम राबविले. चहा, बिस्कीट, लाडू, पाण्याच्या बाटल्या भाविकांना वितरीत करण्यात आल्या. मात्र वल्लभराय महाराज यांच्या भक्तांनी भाविकांची रामघाटावर येणाऱ्या अडचणीचे सूक्ष्म निरीक्षण करून वृद्ध भाविकांना लागणाऱ्या व्हीलचेअर रामघाटावर उपलब्ध करून दिल्या. भाविकांसाठी रामघाटावर विविध ठिकाणी २५ व्हीलचेअर उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्यामुळे वृद्ध, अपंग भाविकांना रामघाटावर येणारी अडचण दूर झाली. सदर चेअरच्या माध्यमातून अशा भाविकांना रामकुंडाच्या ठिकाणी पोहचवले जात होते. वल्लभराय गोस्वामी यांचे भक्तगण या भाविकांना स्वत: व्हीलचेअरच्या साहाय्याने वाहनातून उतरल्यानंतर रामघाटावर स्नानाच्या ठिकाणी सोडत होते. पर्वणीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक संस्थांनी विविध कार्यक्रम हाती घेतले होेते. व्हीलचेअरच्या माध्यमातून भाविकांना शाहीस्नानाचा लाभ मिळवून देण्यासाठी भर पावसात त्यांचे भक्तगण प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले. (प्रतिनिधी)