नाशिक : महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री जयंतीचे औचित्य साधून दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांच्या सेवेसाठी आता नाशिकमधील बसस्थानकांवर व्हीलचेअर उपलब्ध होणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ सीबीएस बसस्थानक येथे करण्यात आला. लोकसभागातून सदर उपक्रम राबविला जात आहे.शहरातील नवीन सीबीएस येथे नाशिक फर्स्ट ट्रॅफिक एज्युकेशन पार्क यांच्याकडून तसेच जुने सीबीएस येथे नामको हॉस्पिटल तर महामार्ग येथे अश्विनी मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल यांच्या वतीने व्हीलचेअर देण्यात आलेली आहे. या सुविधेमुळे बसस्थानकात येणाऱ्या असह्य व्यक्तींना उपयोग होणार असून, या स्थानकांमध्ये चौकशी कक्षात या सुविधेची माहिती प्रवाशांना मिळू शकणार आहे.या उपक्रमाच्या शुभारंभाप्रसंगी विभाग नियंत्रक नितीन मैंद, नाशिक फर्स्टचे अभय कुलकर्णी, संस्थेचे अध्यक्ष मिलिंद जांभोळकर, जनरल सेक्रेटरी देवेंद्र बापट, व्यवस्थापकीय संचालक शशिकांत पारख आदी उपस्थित होते.यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक आगार व्यवस्थापक यांनी केले.
ज्येष्ठ नागरिक, रुग्णांसाठी बसस्थानकांवर व्हीलचेअर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 10:41 PM