शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
2
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
3
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
4
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
5
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
6
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
7
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
8
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
9
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
10
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
11
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
12
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द
13
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."
14
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
15
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
16
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
17
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
18
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
19
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
20
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या

स्कूल बसेसची चाके रुतलेलीच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 9:59 PM

सायखेडा : शासन आदेशानुसार अद्याप शाळांना परवानगी मिळालेली नसल्याने विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे स्कूल बसचालक-मालक अडचणीत आले आहेत.

ठळक मुद्देशाळा बंद : चालक-मालक अडचणीत; कर्जहप्ते थकले, घर चालविणेही अवघड

लोकमत न्यूज नेटवर्कसायखेडा : शासन आदेशानुसार अद्याप शाळांना परवानगी मिळालेली नसल्याने विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे स्कूल बसचालक-मालक अडचणीत आले आहेत.उत्पन्नाचे साधन म्हणून मोठे कर्ज घेत स्कूल बस खरेदी केलेल्या बसमालकांनी उत्पन्न होत नसल्याने वाहनं दारासमोर उभी करून ठेवली आहेत. बससाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची या विवंचनेत मालकवर्ग आहे, तर दुसरीकडे चालकदेखील वेतन नसल्याने अडचणीत आला आहे. पर्यायी नोकऱ्यादेखील उपलब्ध नसल्याने त्यांच्यापुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.कोरोनामुळे अनेकांचे आयुष्य अडचणीत आले आहे. यात स्कूल बसचालक-मालकांचाही प्रश्न आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांनंतर विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी स्कूल बसेस सज्ज असताना शाळाबंदमुळे त्यांच्या उत्पन्नावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरात व ग्रामीण भागात हजाराच्या वर स्कूल बसेसची संख्या आहे. बहुतेक शाळांकडे स्वत:च्या स्कूल बसेस आहेत. त्यांनी चालकांना वेतनावर नेमलेले आहे.दुसरीकडे अनेकांनी स्वत:ची बस खरेदी करून शाळांना लावल्या आहेत. काही मालक स्वत: तर काहींनी चालक ठेवलेले आहेत. मात्र सध्या शाळा बंद असल्याने या स्कूल बसेसची चाके अद्याप रुतलेलीच आहेत. यामुळे स्कूल बसमालक व चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासन-प्रशासनाने याकडेही लक्ष देण्याची विनंती संबंधित व्यावसायिकांनी केली आहे.१ स्कूल बसमालकांप्रमाणेच चालकदेखील अडचणीत आले आहेत. मालकाकडून वेतन बंद झाल्याने तसेच टुरिझम बंद असल्याने इतर कुठेही त्यांना काम मिळेनासे झाले आहे. घर चालविणे गरजेचे असल्याने चालकवर्ग पर्यायी नोकरीच्या शोधात पायपीट करत असल्याचे चित्र आहे. नोकरी मिळत नसल्याने तसेच शिक्षण कमी असल्याने काही चालकांनी भाजीपाला व्यवसाय तर काहींनी मातीकामदेखील स्वीकारले आहे तर काही जण गावी गेले असल्याची माहिती स्कूलमालक संदीप दराडे यांनी दिली. कोरोनामुळे सगळीकडेच नोकऱ्यांवर गंडांतर आल्याने स्कूल बसचालकांसमोर घर चालविण्याचा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे.२ अनेकांनी उत्पन्नाचे स्रोत म्हणून स्कूल बस व्यवसायाची निवड केली. यासाठी बँकांकडून मोठे कर्ज घेतले. आतापर्यंत सर्व ठीक होते. हप्ते वेळेवर भरले; परंतु कोरोनामुळे शाळा उघडण्यास परवानगी नसल्याने स्कूल बसेसदेखील बंद ठेवाव्या लागल्या. परिणामी उत्पन्न होत नसल्याने हप्ते थकले आहेत. बँकांची कर्जफेड कशी करावी तसेच कुटुंब कसे चालावावे, असे मोठे प्रश्न स्कूल बसमालकांपुढे उभे ठाकले आहेत.मी शेती करतो. जोडधंदा म्हणून स्कूल बसचा पर्याय निवडला होता. बँकेकडून कर्ज घेत व्यवसाय सुरू केला. प्रतिसादही चांगला मिळाला. मात्र आता अडचणी सुरू झाल्या आहेत. कर्ज हप्ते थकले. उत्पन्न नसल्याने घर चालविणे अवघड झाले आहे. असल्याने पर्यायी नोकरीसाठी अनेक ठिकाणी विचारपूस केली मात्र नकार मिळाला. यामुळे आता पुढील आयुष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.- ज्ञानेश्वर कमानकर,स्कूल बसचालक-मालक

टॅग्स :Bus DriverबसचालकSchoolशाळा