नाशिक : वेळ रात्री साडेनऊ वाजेची... ठिकाण : शिंदे पळसे शिवार... येथील एका उसाच्या शेतात जवळ वनविभागाने लावलेल्या पिंजºयात शनिवारी रात्री बिबट्या अडकतो. डरकाळ्यांचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक पिंजºयाच्या दिशेने धाव घेतात आणि एकच गर्दी जमते. कोणी बॅटरी पिंजºयावर चमकवतो तर कोणी मोबाइलद्वारे पिंजºयात जेरबंद बिबट्याचे चित्रिकरणासाठी आटापिटा करतो अन्् कल्लोळ होतो. यामुळे कैद झालेला बिबट्या अधिकच आक्रमक होऊन आपली सुटका करून घेण्यासाठी जोरजोराने पिंजºयाच्या दरवाजावर धडका मारू लागतो. परिणामी दरवाज्याला असलेले स्प्रिंग लॉक तुटते आणि बिबट्या पिंजºयातून बाहेर पडतो.नाशिक तालुक्याच्या पूर्व भागात धारणा आणि गोदावरी काठाच्या मध्यभागी असलेल्या मळे परिसरात बिबट्याचा वावर हा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शिंदे-पळसे एकलहरे, चाडेगाव, हिंगणवेढे, गंगापाडळी, कोटमगाव, सामनगाव या नाशिक पश्चिम वनविभागाच्या नाशिक परिमंडळमधील गावांमध्ये वन विभागांकडून ठिकाणी पिंजरे तैनात करून बिबटे जेरबंद करण्याचे प्रयत्न केले जात आहे. शिंदे पळसे शिवारात डोबी वस्तीवरील गायधनी यांच्या शेतात वनविभागाने पिंजरा लावला होता. पिंजºयात शनिवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाला. असे समजताच पिंजºयाभोवती नागरिक जमा झाले. नागरिकांचा एकच गलका झाल्याने उसाच्या शेतातील मादी निघून गेली; मात्र पिंजºयात अडकलेला बिबट हा अधिकच गुरगुरू लागला. नागरिकांची गर्दी आणि गोंधळ गोंधळ झाल्याने बिबट्याने सुटकेसाठी प्रयत्न सुरू करत पिंजºयाला धडक देऊ लागला. यामुळे अखेर पिंजºयाच्या दरवाजाचे स्प्रिंग लॉक तुटले. सुदैवाने पिंजºयाभोवती जमलेल्या गर्दीच्या लक्षात आल्याने तेथून जमावाने पळ काढला.पुढील काही मिनिटांत त्या बिबट्याने आपल्या पुढच्या पायांच्या साहाय्याने दरवाजा उचकावत डोके बाहेर काढून ताकदीने बाहेर झेप घेत ऊस शेतीत धूम ठोकली. या भागात दोन बिबट्याचा संचार असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे आता रहिवाशांचे धाबे दणाणले आहे.बिबट्या पिंजºयात बंद झाल्याची माहिती वन विभागाला मिळताच वनक्षेत्रपाल विवेक भदाणे, वनपाल मधुकर गोसावी, वनरक्षक राजेंद्र ठाकरे, संचालक प्रवीण राठोड आदींनी परिसरात सर्च आॅपरेशन राबवून बिबट्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांना बिबटे ऊस शेतीतून पुढे द्राक्ष मळ्यात सरकत असल्याचे दिसून आले. यावेळी वनाधिकाऱ्यांनी नागरिकांना समज देऊन जेरबंद झालेल्या पिंजºयाजवळ यापुढे कधीही जाऊ नये, तसेच बिबट्यावर कोणतीही वस्तू फेकू नये. अन्यथा दुर्घटना घडू शकते, असे सांगितले.
जेरबंद झालेला बिबट्या पिंजऱ्यातून सुटतो तेव्हा....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 12:08 AM
वेळ रात्री साडेनऊ वाजेची... ठिकाण : शिंदे पळसे शिवार... येथील एका उसाच्या शेतात जवळ वनविभागाने लावलेल्या पिंजºयात शनिवारी रात्री बिबट्या अडकतो. डरकाळ्यांचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक पिंजºयाच्या दिशेने धाव घेतात आणि एकच गर्दी जमते. कोणी बॅटरी पिंजºयावर चमकवतो तर कोणी मोबाइलद्वारे पिंजºयात जेरबंद बिबट्याचे चित्रिकरणासाठी आटापिटा करतो अन्् कल्लोळ होतो. यामुळे कैद झालेला बिबट्या अधिकच आक्रमक होऊन आपली सुटका करून घेण्यासाठी जोरजोराने पिंजºयाच्या दरवाजावर धडका मारू लागतो. परिणामी दरवाज्याला असलेले स्प्रिंग लॉक तुटते आणि बिबट्या पिंजºयातून बाहेर पडतो.
ठळक मुद्देपळसे शिवारातील घटना : पिंजºयाभोवती गर्दी जमल्याने बिबट्या आक्रमक