चांदोरी/सायखेडा : येथील फुप्फुसाच्या दुर्धर आजाराने त्रस्त असलेल्या एक महिलेला डॉक्टरांनी शनिवारी रात्री मृत घोषित केले. सकाळी अंत्यसंस्काराची तयारी सुरु असताना तिचे पार्थिव सकाळी घरी नेताना त्यांना लावलेले व्हेंटिलेटर काढताच ओठांची हालचाल जाणवली आणि महिला जिवंत असल्याचे लक्षात येताच ‘देव तारी त्याला कोण मारी’चा प्रत्यय रविवारी आला. चांदोरी येथील जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे यांच्या काकू संध्या सुरेश वनारसे या फुफ्फुसाच्या व्याधीने आजारी असल्याने पंधरा दिवसांपासून नाशिकला खासगी रूग्णालयात उपचार घेत होत्या. परंतु शनिवारी (दि.१९) त्यांची प्रकृती खालावली. डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले पण उपचारास प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहुन डॉक्टरांनी रात्री ११.५० वाजता त्यांची प्राणज्योत माळवल्याचे जाहीर केले व वनारसे कुटुंबात शोककळा पसरली. रात्रीची वेळ असल्याने सकाळी अंत्यसंस्कार करण्याचे ठरवले. सगळीकडे नातेवाईकांना फोन व मेसेजद्वारे अंत्यसंस्काराची वेळ कळविण्यात आली. दरम्यानच्या काळात संध्या वनारसे यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. रात्रभर चांदोरी येथील वनारसे वस्तीवरील घरी जवळचे नातेवाईक जागेच होते. हॉस्पिटलमध्येही काही जण थांबले होते. सकाळी पार्थिव नेण्यासाठी दुसऱ्या दिवशी सकाळी चांदोरी येथे अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली होती.आता फक्त संध्या वनारसे यांच्या मृतदेहाची प्रतिक्षा होती.इकडे रु ग्णालयात रात्रभर जागे असणाºया नातेवाईकांनी पार्थिव ताब्यात घेण्यासाठी डॉक्टरांची परवानगी मागितली. परिचिरकेने संध्या वनारसे यांच्या नाकाला लावलेले व्हेंटिलेटर काढताच ओठांची हालचाल जाणवली व डॉक्टरांनाही ही रु ग्णाची बरीच हालचाल जाणवली व तातडीने उपचार सुरूवात करत आॅक्सिजनचा पुरवठा सुरू केला.इकडे चांदोरीत दोन ते तीन हजारांचा जमाव अंत्यसंस्कारासाठी जमा झालेला होता.त्याच दरम्यान संध्या वनारसे यांची प्रकृती व्यवस्थित असल्याचा निरोप आला आणि शोकाकुल वातावरण क्षणात बदलून सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला.---------------------------गेल्या पंधरा दिवसांपासून आमच्या काकू नाशिकला खासगी रु ग्णालयात उपचार घेत होत्या.काल डॉक्टरांनी व्हेंटिलेटर काढत त्यांना घरी घेऊन जा असे सांगितले . त्यांच्या निधनाची बातमी आम्ही सर्वत्र दिली. अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना काकू जिवंत असल्याचे समजले. हा चमत्कारच म्हणावा लागेल, काकूंना दिर्घोयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.--सिद्धार्थ वनारसे ,जिल्हा परिषद सदस्य,चांदोरी.
मृत महिला जिवंत होते तेव्हा...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 16:45 IST