नाशिक : भर दुपारी अचानकपणे विनयनगर परिसरातील दमयंती सहकारी सोसायटीची इमारत हादरली. इमारतीच्या वरच्या मजल्यावरील एका सदनिकेतून स्फोटाचा भीषण आवाज आल्याने सगळे रहिवाशी घराबाहेर पडले. यावळी वरच्या मजल्यावर असलेल्या राजेंद्र पाटील यांच्या घरामधून धूराचे लोट उठत असल्याचे लक्षात येताच रहिवाशांनी अग्नीशामक दलाला माहिती दिली. अवघ्या काही मिनिटांत सिडको उपकेंद्र व मुख्यालयाचे जवान बंबासह घटनास्थळी पोहचले. पाण्याचा मारा करत आग विझविली. घर बंद असल्याने मोठा अनर्थ टळला.याबाबत अग्निशमन मुख्यालयाकडून मिळालेली माहिती अशी, बुधवारी (दि.२२) विनयनगरमधील दमयंती सोसायटीत दुपारच्या सुमारास स्फोट होऊन आवाज झाल्याने आग लागली. येथील दुसऱ्या मजल्यावर राहणारे इगतपुरी येथील कृषी विभागाचे कर्मचारी राजेंद्र पाटील काही कामासाठी बाहेर गेले होते तसेच त्यांचे कुटुंबीय भुसावळ येथे गेले होते. घर बंद असल्याने अनर्थ टळला. स्फोट होऊन लागलेल्या आगीमुळे घरातील विद्यूत उपकरणांसह अन्य संसारपयोगी वस्तू जळून खाक झाली.घरातील तीनही गॅस सिलिंडर सुस्थितीत अग्निशामक दलाच्या जवानांनी बाहेर काढले तसेच वॉशिंग मशिन, फ्र्रिज, गिझर आदि उपकरणेही जळाली नाही; मात्र टीव्ही जळून खाक झाल्याचे अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगितले. बंद टीव्हीचा स्फोट कसा होऊ शकतो? असा प्रश्न जवनांना पडला. उशिरापर्यंत स्फोट कसला झाला याचे कारण उलगडले नाही. सिडको उपकेंद्राचे बंबचालक संजय तुपलोंढे यांनी अवघ्या काही मिनिटांत फायरमनसह घटनास्थळ गाठले. तसेच फायरमन संजय गाडेकर, इकबाल शेख, तौसिफ शेख, प्रमोद लहामगे, किशोर पाटील, तानाजी भास्कर, संजय राऊत आदिंनी तत्काळ आग विझविली.बाल्कनीला तडा; खिडक्यांच्या काचा फुटल्यासदनिकेत झालेल्या स्फोटाची तीव्रता इतकी होती की, बाल्कनीच्या भींतीला तडा गेला तसेच खिडक्यांच्या काचा फुटल्या. बाल्कनीला लावलेली लोखंडी ग्रीलचेही नुकसान झाले. बाल्कनीच्या कोपरा भींतीपासून वेगळा झाला असून बाल्कनी कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे.
इंदिरानगरमधील दयमंती सोसायटी गुढ स्फोटाने हादरते तेव्हा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 4:48 PM
नाशिक : भर दुपारी अचानकपणे विनयनगर परिसरातील दमयंती सहकारी सोसायटीची इमारत हादरली. इमारतीच्या वरच्या मजल्यावरील एका सदनिकेतून स्फोटाचा भीषण ...
ठळक मुद्देबाल्कनीला तडा; खिडक्यांच्या काचा फुटल्या