नाशिक: जंगलातील आग विझविण्यासाठी नखभर चोचीने आगीवर पाणी शिंपडणाºया चिमणीच्या गोष्टीप्रमाणे आपणही आग विझविणाऱ्यांच्या यादीत असावे यासाठी कोरोना योद्धा बनून समाजातील प्रत्येक घटकाने कारोनाची आग विझविण्यासाठी योगदान दयावे अशी साद जिल्हाधिकाºयांनी नाशिककरांना घातली आहे.समाजशक्ती एकवटली तर नाशिककर इतिहास घडवू शकतील असा विश्वास व्यक्त करीत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सोशल मिडीयातून नाशिककरांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाचे युद्ध जिंकण्यासाठी शासन प्रशसन गेल्या सात महिन्यांपासून अहोरात्र लढाई करीत आहेत. यापुढेही ते करत राहाणार आहेच परंतू एक समाजघटक म्हणून प्रत्येक नाशिककरांनी या युद्धात उतरण्याची अपेक्षा जिल्हाधिकाºयांनी व्यक्त करतांना आता एकत्र येण्याची वेळ आली असल्याचे म्हटले आ हे.समाजातील काही घटकातील लोेक यात महत्वपुर्ण भूमिका बजावू शकतात यासाठी त्यांनी उद्योगापासून स्वयंसेवक होऊ इच्छिणाºयांना कोरोना युद्धात उतरण्याचे आवाहन केले आहे. विलगीकरणासाठी खोल्या उपलब्ध करून देणारे हॉटेल्स, हॉस्टेल्स उपलब्ध करवून देणारे, फेवर क्लिनिक चालविणारे आणि करोना वॉर्डात सेवा देऊ इच्छिणाºया खासगी डॉक्टर्सकडून त्यांनी अेपक्षा व्यक्त केली आहे. समुपदेश करणारे तज्ज्ञ आणि चोवीस तास वैद्यकीय दुकाने सुरू ठेवणाºया दुकानदारांनकडूनही त्यांना अेपक्षा आहेत. विमा योजनेसाठी कागदोपत्री मदत करण्याची प्रशासकीय जबाबदारी स्विकारणारे विद्यार्थी आणि गर्दीच्या ठिकाणी प्रबोधन करून गर्दी नियंत्रण करणारे स्वंयसेवकांचीही त्यांना हवे आहेत.समाजहितासाठी स्वयंस्फूर्तीने कोरानाच्या लढाईत अगदी चिमणी प्रमाणे वाटा उचलला तरी ती मोठी मदत ठरणार आहे. याच भावनेतून जिल्हाधिकाºयांनी जंगलातील आगीचे उदाहारण देतांना जेंंव्हा कधी या आगीचा इतिहास लिहला जाईल त्या यादीत नखभर का होईना सहभाग असणाºयांच्या यादीत प्रत्येक नाशिककरांचे नाव असावे अशी भावनिक साद त्यांनी घातली आहे.