शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह' ! महिला सुरक्षेसाठी अजित पवारांचा 'पंचशक्ती' निर्णय
2
मविआच्या जागावाटपात संजय राऊतांसोबत वाद?; नाना पटोलेंनी सगळंच सांगितलं
3
Iran-Isreal तणावात गुंतवणूकदारांचे ₹५.६२ लाख कोटी स्वाहा, सेन्सेक्सचा एकच शेअर ग्रीन झोनमध्ये; निफ्टीही आपटला
4
ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला अपहरण करून बेदम मारलं; धारदार शस्त्राने बोटे छाटले, वाद काय?
5
ज्योत आणायला गेलेल्या भाविकांच्या गाडीचा अपघात; दोघे ठार, सहा जण गंभीर जखमी
6
इस्रायल-इराण युद्ध एकतर्फी होणार नाही; जाणून घ्या कुणाची लष्करी ताकद किती?
7
पुणे हेलिकॉप्टर अपघातील मृतांबाबत महत्त्वाची समोर; भारतासाठी दिलं होतं मोठं योगदान
8
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...
9
भारतीय गाढ झोपेत असताना दिसले 'रिंग ऑफ फायर', वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे अमेरिकेतून फोटो आले...
10
यूएनच्या सरचिटणिसांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी; इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची इस्रायलची धमकी
11
Share Market News : गुंतवणूकदारांना शेअर बाजार पावला, या वर्षी कमावले ११०.५७ लाख कोटी; जाणून घ्या
12
इराणच्या आण्विक स्थळांवर इस्त्रायली हल्ल्याला अमेरिका समर्थन देणार नाही, बायडेन यांनी केले स्पष्ट
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी
14
उपचारासाठी आले अन् कॅबिनमध्ये केली डॉक्टरची हत्या; पोलिसांकडून दोघांचा शोध सुरु
15
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
16
नवरात्री: ‘माझ्यासाठी जे काही चांगले आहे, ते मला अवश्य मिळेल’
17
मविआतील लहान घटक पक्षांना हव्यात ४० जागा; प्रस्तावावर ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा
18
अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी
19
मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे सभेत वादग्रस्त विधान
20
मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक

...जेव्हा वृक्षछायेत जुळतात रेशीमगाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2020 10:42 PM

ठरलेल्या मुहूर्तावर पुरोहितासह नववधू, नवरदेव व दोन्ही बाजूंचे अगदी दहा ते बारा व-हाडी आंब्याच्या सावलीखाली एकत्र आले आणि ठरलेल्या मुहूर्तावर मंगलाष्टके म्हणत गुरूजींना शुभमंगल पार पाडले.

ठळक मुद्देकठीण काळात आपली हौसमौज महत्त्वाची नसतेदेश अन् देशाची स्थिती खूप महत्त्वाची ठरते

नाशिक : विवाहसोहळा म्हटला की अंगणात मांडव तर हमखास पडतो अन् त्या मांडवामध्ये मोठ्या थाटात नववधू-वराच्या आयुष्याच्या रेशीमगाठी जुळतात मात्र नाशिकमधील सय्यदपिंप्री या लहानशा गावात चक्क अंगणातील एका वृक्षाच्या सावलीतच नववधू-वरांवर बोटावर मोजण्याइतक्या कुटुंबियांनी अक्षता टाकत शुभाशिर्वाद दिले. कोरोनाच्या संकटकाळात अगदी साधेपणाने गायकवाड व शिरसाठ या दोन्ही कुटुंबियांनी आपल्या मुला-मुलीचा लग्नसमारंभ आटोपशीर घेतला.ठरलेल्या मुहूर्तावर पुरोहितासह नववधू, नवरदेव व दोन्ही बाजूंचे अगदी दहा ते बारा व-हाडी आंब्याच्या सावलीखाली एकत्र आले आणि ठरलेल्या मुहूर्तावर मंगलाष्टके म्हणत गुरूजींना शुभमंगल पार पाडले. यावेळी जणू वाजंत्रीची भूमिका आंब्यावर बसलेल्या विविध पक्ष्यांनी त्यांच्या मंजूळ आवाजात चोख बजावली.दीपक शिरसाठ, व माधुरी गायकवाड या दोघांचा विवाहसोहळा कोरोनाच्या काळात अगदी ‘लॉकडाउन’चे सर्व नियम पाळत पार पडला. या दोघांनी आपआपल्या तोंडावर मास्क बांधूनच ‘आंतर’ ठेवत एकमेकांच्या गळ्यात हार टाकला. दीपक एका चांगल्या कंपनीत सुपरवायझर तर माधुरी या लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरीला आहे. दोघेही सुशिक्षित असल्यामुळे त्यांनी आपल्या विवाहचे निमंत्रण सोशल मिडियावर आपल्या हितचिंतकांना धाडले खरे; मात्र या निमंत्रणात ‘आपल्या घरीच रहा, अन आमच्या भावी वैवाहिक आयुष्याकरिता शुभेच्छा द्या’, असे आवर्जून त्यांनी नमूदही केले.मूळ चांदवड तालुक्यातील उसवाड गावच्या गायकवाड कुटुंबातील माधुरी. माधुरी आपल्या आजोळी सय्यद पिंपरी येथे येऊन स्थायिक झाल्या. तर दीपक हा सय्यद पिंपरी येथील शेतकरी चंद्रकांत शिरसाठ यांचा मुलगा. पुरोगामी विचारसरणीच्या या दोन्ही कुटुंबीयांनी या काळात आतिशय सध्या पद्धतीने लग्न क रत समाजापुढे कठीण काळात आपली हौसमौज महत्त्वाची नसते तर देश अन् देशाची स्थिती खूप महत्त्वाची ठरते, हेच दाखवून देण्याचा प्रयत्न केला. या आगळ्यावेगळ्या विवाहची चर्चा मात्र सय्यदपिंप्री गावात चांगलीच रंगली. 

टॅग्स :Nashikनाशिकmarriageलग्नCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस