शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

बारावीच्या गुणपत्रिका मिळणार केव्हा ? विद्यार्थ्यांना प्रतीक्षा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 6:23 PM

बारावीच्या गुणपत्रिका कधी मिळणार याविषयी विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. निकाल लागून आठवडाभराचा कालावधी उलटूनही विद्यार्थ्यांना अद्याप गुणपत्रिका मिळालेल्या नाही. त्यामुळे पुढील शैक्षणिक प्रवेशांची प्रक्रियाही रखडली आहे.

ठळक मुद्देबारावीच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेची प्रतिक्षाआठवडा उलटूनही गुणपत्रिकांची प्रतिक्षा कायम

नाशिक : बारावीचा निकाल लागून आठवडाभराचा कालावधी उलटूनही विद्यार्थ्यांना अद्याप गुणपत्रिका मिळालेल्या नाही. त्यामुळे पुढील शैक्षणिक प्रवेशांची प्रक्रियाही रखडली असून, बारावीच्या गुणपत्रिका कधी मिळणार याविषयी विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. दरम्यान, विभागीय शिक्षण मंडळाला शनिवारपर्यंत गुणपत्रिका मिळणार असून, या गुणपत्रकांचे वितरणासाठी नाशिक विभागीय मंडळाकडून नियोजन करण्यात येत आहे.माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल १६ जुलैला आॅनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला असला तरी अद्याप विद्यार्थ्यांना अजूनही गुणपत्रिका प्राप्त झालेल्या नाही. नाशिक विभागातून ८९ हजार २५ मुले व ६७ हजार ६६४ मुले असे एकूण १ लाख ५६ हजार ७८९ विद्यार्थी बारावीच्या परीक्षे प्रविष्ट झाले होते. त्यौपकी असे एकूण १ लाख ३९ हजार ३४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, नाशिक जिल्ह्यातील ७० हजार १२९ विद्यार्थ्यांपैकी ६२ हजार ७३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात नाशिक  महानगरपालिका क्षेत्रातील ५९ कनिष्ठ महाविद्यालयांमधील १० हजार २७ उत्तीर्ण विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. या सर्व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी गुणपत्रिकांची प्रतीक्षा लागलेली असून, अजूनही थेट विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणपत्रिका केव्हा मिळणार याविषयी विभागीय मंडळाने कोणतीही स्पष्टता दिलेली नाही. आॅनलाइन निकाल जाहीर करतानाच विद्यार्थ्यांना गुणपत्रिका क धी मिळणार हे स्पष्ट केले जाते. परंतु, यावर्षी कोरोनाच्या  पार्श्वभूमीवर जवळपास दीड महिने निकाल लांबला असून, आता गुणपत्रिका प्रत्येक महाविद्यालयापर्यंत पोहोचविण्याच्या प्रक्रियेतही विलंब होणार आहे. दरवर्षी गुणपत्रिका प्राप्त झाल्यानंतर महाविद्यालयांमध्येच विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वितरण केले जाते. यावर्षी महाविद्यालयांना गुणपत्रिका मिळाल्यानंतरही कोरोनाच्या संकटामुळे त्यांचे वाटप कसे होणार याविषयी विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकStudentविद्यार्थीHSC Exam Resultबारावी निकालSchoolशाळा