गणेश शेवरे ।पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव अग्निशमन दल हे नाशिक जिल्ह्यातील सर्वांत जुन्या अग्निशमन दलापैकी एक असून येथेसुविधांची वाणवा आहे.सेवेस तत्पर असलेल्या या केंद्राची स्थापना १९९२ मध्ये झाली या कालावधीत आतापर्यंत अंदाजे पाच हजारांहून अधिक छोट्या मोठ्या प्रसंगाला येथील अग्निशामक दल सामोरे गेले आहे, पण येथील वाहनास आज २७हून अधिक वर्ष उलटूनही एवढ्या वर्षांनंतरही पिंपळगाव बसवंत अग्निशामक दलाचे वाहन निफाड, दिंडोरी आणि चांदवड तालुक्यातील गावांच्या सुरक्षिततेसाठी वरदान ठरत आहे.पिंपळगावासह निफाड, दिंडोरी व चांदवड या तिन्ही तालुक्यांत अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. अलीकडेच गोरठाण परिसरात अपघाती सुकोई विमान पडल्याने लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी या केंद्राला सुविधांअभावी कसरत करावी लागली. गॅस सिलिंडरच्या दुर्घटना, शॉटसर्किटमुळे लागलेली आग या सकंटांना सामोरे जाण्यासाठी २७ वर्षीय जुन्या वाहनाला घेऊन येथील जवान प्रसंग आटोक्यात आणण्यासाठी कसरत करतात. यामुळे एक नवीन तंत्रज्ञानाने विकसित केलेले वाहन असणे गरजेचे आहे. आता हे केंद्र ‘फायरप्रूफ’ करण्याची गरज निर्माण झाली आहे.विविध गावांमधील नैसर्गिक आपत्तीमध्ये येथील अग्निशमन दलाने मोलाची कामगिरी बजावली आहे. महापूर अशा तसेच अन्य नैसर्गिक आपत्तीपासून ते पाण्यात पडलेल्या डेड बॉडी शोधण्यासह गणपती विसर्जन अतिमहत्त्वाचे योगदान देणाº्या दलाच्या जवानांच्या व्यथांना तसेच अडचणींची सोडवणूक मात्र म्हणावी तशी होत नाही. थेट आगीशी सामना करताना श्वानापासून ते स्वत:चा बचाव करत आगीत अडकलेल्यांची सुखरूप सुटका करण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण तसेच साधनसामग्री मिळणे या जवानांना आवश्यक आहे.आपत्तीच्या वेळी जलदगतीने प्रतिसाद देणे तसेच आपत्तीच्या ठिकाणी वेळेत पोहोचण्यासाठी अत्याधुनिक कार्यप्रणाली असलेले वाहनाची गरज आहे. इंटिग्रेटेड कमांड व कंट्रोल सिस्टिम, जीआयएस व जीपीएसवर आधारित स्वयंचलित वाह न ट्रॅकिंग प्रणाली आणि डिस्ट्रेस कॉल रिस्पॉन्स व्यवस्थापन यंत्रणा असावी. डायल १०१ ही प्रणाली असलेले गावांचा व्याप वाढला आहे.अग्निशामकची सुविधा पुरविली जाणाऱ्या पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीकडे बदलते तंत्रज्ञान, वाढत्या औद्योगिकीकरणासह आणखी एक अत्याधुनिक वाहन असणे गरजचे आहे. ग्रामपालिका, बाजार समिती व एम.आय.डी.सी यांनी आपले हेवेदावे बाजूला ठेवून गावाच्या व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नवीन तंत्रज्ञानाचे वाहन घेणे गरजेचे असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहे.निफाड तालुक्यासह दिंडोरी, चांदवड या तिन्ही तालुक्यांचा विस्तार वाढला आहे. केमिकल झोन तसेच वाढते पेट्रोल पंप व कारखानदारी वाढली आहे. या सर्वांची सुरक्षितता केवळ पिंपळगाव बसवंतच्या अग्निशमक दलावर आहे. त्यामुळे अजून एक नवीन अत्याधुनिक कार्यप्रणाली असलेले वाहन व त्यात इंटिग्रेटेड कमांड व कंट्रोल सिस्टिम, जीआयएस व जीपीएसवर आधारित स्वयंचलित वाहन ट्रॅकिंगप्रणाली आणि डिस्ट्रेस कॉल रिस्पॉन्स व्यवस्थापन यंत्रणा-डायल १०१ ही प्रणाली असलेले वाहन असणे गरजेचे आहे.- सुनील मोरे, अग्निशमक प्रमुख, पिंपळगाव बसवंत
पिंपळगावचे अग्निशमनदल कधी होणार ‘फायरप्रूफ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 11:33 PM
गणेश शेवरे । पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव अग्निशमन दल हे नाशिक जिल्ह्यातील सर्वांत जुन्या अग्निशमन दलापैकी एक असून येथेसुविधांची ...
ठळक मुद्देअत्याधुनिक वाहनांची गरज : निफाडसह दिंडोरी, चांदवड या तालुक्यांचा वाढता विस्तार