शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
2
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
3
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
4
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
5
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
6
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
7
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
8
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
9
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
10
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
11
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
12
शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी!
13
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी
14
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
15
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
16
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
17
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
18
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
19
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
20
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा

पर्यटन क्षेत्र अनलॉक कधी करणार: तानचे अध्यक्ष राजेंद्र बकरे यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 1:06 PM

नाशिक : (संजय पाठक) पर्यटन हा देशात सर्वधिक चलनवलन निर्माण करणारे क्षेत्र आहे.केवळ टुर्स कंपन्या पुरता हा उद्योग मर्यादीत ...

नाशिक: (संजय पाठक) पर्यटन हा देशात सर्वधिक चलनवलन निर्माण करणारे क्षेत्र आहे.केवळ टुर्स कंपन्या पुरता हा उद्योग मर्यादीत नसून ज्या भागात पर्यटन आहे. अशा ग्रामीण अथर्कारणाला त्यातून चालना मिळते. देशात सर्व उद्योग अ?ॅनलॉक होत असताना पर्यटन क्षेत्रच फक्त बंद का असा प्रश्न नाशिकच्या तान(ट्रॅव्हल एजंटस असोसिएशन आॅफ नाशिक) या पर्यटन व्यवसायिकांच्य संघटनेचेअध्यक्ष राजेंद्र बकरे यांनी केला आहे. ग्रामीण भागाला मोठा आधार असलेलाहा उद्योग शासनाने सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणीही बकरे यांनीकेली आहे.प्रश्न- पर्यटन क्षेत्राच्या सद्यस्थिती विषयी काय सांगाल?बकरे - देशाच्या अथर्कारणात नव्हे तर जीडीपीत देखील महत्वाचा वाटाअसलेल्या या पर्यटन आणि हॉस्पीटीलीटी क्षेत्राचे कंबरडे मोडले आहे.पर्यटन हा मुळातच अत्यावश्यक सेवेचा भाग नाही, असे मानले गेल्यानेलॉकडाऊनचा सर्वात पहिला फटका याच व्यवसायाला बसला. पंतप्रधानांनी देशातीलउद्योग व्यवसाय सावरण्यासाठी २०लाख कोटी रूपयांचे पॅकेज दिले मात्र,त्यात पर्यटन क्षेत्राचा कोठेही समावेश नाही. एकंदरच शासनाच्यादृष्टीकोनातून पर्यटन क्षेत्र सर्वाधिक दुर्लक्षीत आहे.प्रश्न- पर्यटनामुळे कोरोनाची भीती व्यक्त केली जाते...बकरे- आज पर्यटन क्षेत्राला अधिकृत परवानगी नसतानाही नागरीक लहान मोठ्या ट्रीप काढतच आहेत. त्यात नियमांचे पालन होईलच हे कसे गृहीत धरले जाते? पर्यटन व्यवसाय सुरू झाल्यास नागरीकांबरोबरच व्यवसायिक काळजी घेतील आणि सुरक्षा नियमांचे पालन देखील करतील. परंतु हॉटेल्स आणि पर्यटन व्यवसायाला पूणर्त: परवानगी द्यायला हवी. यासंदर्भात केंद्र आणि राज्य सरकार तसेच स्थानिक स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी देखील केली आहे. परंतु उपयोगझालेला नाही.प्रश्न- शासनाने नेमके काय करावे असे वाटते?बकरे- पर्यटन व्यवसाय हा एजंटस पुरता मर्यादीत नाहीत. शेकडो उद्योगत्यावर अवलंबून आहेत. आज ग्रामीण भागात एखाद्या वनपर्यटनाला गेलेतरीतेथील किरकोळ खाद्य पदार्थ विकणाऱ्यांची, धार्मिक पर्यटन असेल तर फुलमाळा, पुजेचे साहित्य विकणाºयांची गुजराण पर्यटकांवर होते हे लक्षातघेतले पाहिजे. दुसरा टोकाचा विचार केला तर देश- विदेशातील पर्यटकांमुळेविदेशी चलन देखील मिळते. परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. किमानसरकारी कमर्चाºयांच्या एलटीएमुळे तरी पर्यटन वाढेल अशी अपेक्षा होती.मात्र शासनाने त्यांना पर्यटनाऐवजी अन्य खर्चाचा विकल्प दिला आहे,अशामारक धोरणामुंळे पर्यटन क्षेत्र कसे टिकेल याचा विचार केला पाहिजे. मिशेनबिगेन मध्ये अन्य उद्योग आणि व्यवसायांबरोबरच पर्यटन वाढले पाहिजे, याकडेलक्ष पुरवण्याची गरज आहे.

टॅग्स :Nashikनाशिक