इंदिरानगर : वर्दळीच्या ंिठकाणी रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या भाजीबाजारामुळे झालेली वाहतूक कोंडी आणि पार्किंगचा प्रश्न निर्माण होत असल्याने अपघाताला निमंत्रण देणारा पांडवनगरी येथील अनधिकृत भाजीबाजार केव्हा हटविण्यात येणार याबाबत स्थानिकांकडून विचारणा केली जात आहे.पांडवनगरीकडे जाणाऱ्या रस्त्यावरच अनधिकृत भरणाºया भाजीबाजारामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याची तक्र ार नागरिकांनी अनेकदा केलेली आहे. सदर भाजीबाजाराला पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याबाबतदेखील पाठपुरावा करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.रस्त्यावरील भाजीबाजार दिवसेंदिवस वाढतच असून, त्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. येथील विक्रेत्यांना रस्त्यावर विक्रीसाठी बसण्यास परवानगी नसतानाही सर्रासपणे रस्त्यावर भाजीबाजार मांडला जात आहे.वडाळा-पाथर्डीलगतच एक किलोमीटर अंतरावर पांडवनगरी वसाहत आहे. यामध्ये सुमारे अडीच हजार सदनिका असून, परिसरात दिवसागणिक अपार्टमेंट आणि सोसायट्या वाढत आहेत. परिसरात झपाट्याने रहिवासीक्षेत्र वाढत असतानाच नवनवीन समस्यादेखील निर्माण होत आहेत. यामध्ये भाजीबाजारअभावी नागरिकांची आणि विक्रेत्यांनी गैरसोय होत आहे. सायंकाळ होताच वडाळा-पाथर्डी रस्ता ते पांडवनगरीकडे जाणाºया रस्त्याच्या दुतर्फा सुमारे ५० ते ६० भाजीविक्रेते रस्त्यावरच बसतात त्यामुळे त्यांच्याकडे येणारे ग्राहक आपली वाहने रस्त्यावर लावत असल्याने वाहतुकीस रस्ता अरुंद पडत आहे, तसेच वाहतुकीस होणारा अडथळ्यांमुळे लहान-मोठे अपघातही नेहमीच घडत असतात परिसरात रस्त्यावर भरणाºया भाजीबाजारामुळे नागरिक हैराण झाले आहेत.रस्ता नेमका कुणासाठी?सायंकाळी ६ वाजेपासून ते रात्री ८ वाजेपर्यंत भाजीविक्रेत्यांमुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद होऊन जातो. ‘सदर रस्ता भाजीविक्रेत्यांसाठी असून, वाहतुकीसाठी नाही’ निदान असा फलक तर मनपाने लावावा, अशी उपरोधक मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे. रस्त्यावरील भाजीबाजारामुळे वाहतूक कोंडींबरोबरच अपघाताचे प्रकार घडत असतानाही महापालिका त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांमध्ये संताप आहे.
अनधिकृत भाजीबाजार केव्हा हटविणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2019 1:26 AM