नाशिक : तुमको देखा तो ये खयाल आया, तुम इतना जो मुस्करा रहे हो, झुकी झुकी सी नजर, होठो से छु लो तुम, होशवालों को खबर क्या बेखुदी क्या चीज है, दर्द से मेरा दामन भर दे... अशा अजरामर झालेल्या गझल गायनाने प्रसाद गोखले आणि वीणा गोखले यांनी प्रसिद्ध गझलगायक जगजितसिंग यांना सुमधुर स्वरांजली वाहिली.जगजितसिंग यांच्या प्रसिध्द गीतांच्या ‘कहा तुम चले गये’ कार्यक्र म प्रसाद गोखले आणि वीणा गोखले यांनी सादर केला. जगजितसिंग यांनी गायलेल्या हे राम हे राम या भजनाने कार्यक्र माची सुरुवात झाली. त्यानंतर बात निकालेगी तो फिर दूर तलक जाएगी, गम का खजाना तेरा भी है, मेरा भी है या गीतांनी प्रसाद यांनी तर वीणा यांनी गायलेल्या या अल्लाह, दर्दसे मेरा दामन भर दे लादेखील भरभरून दाद मिळाली. झुकी झुकी सी नजर, होठो से छू लो तुम, तुम इतना जो मुस्करा रहे हो.. या गीतांसह चिठ्ठी ना कोई संदेश, जाने वो कौनसा देस या गझलांनादेखील रसिकांची पसंती लाभली. कार्यक्र मादरम्यान शशांक कांबळे यांच्या निवेदनानेही रंगत आणली. ज्येष्ठ कलाकार प्रमोद जांभेकर यांनी व्हायोलिनवर, तबल्यावर सतीश पेंडसे, आॅक्टोपॅडवर अभिजित शर्मा, किबोर्डवर अनिल धुमाळ, गिटारवर आशिष ढेकणे यांनी संगीत साथ केली. प्रसाद गोखले यांच्या विद्यार्थ्यांनी गायलेल्या भैरवीने कार्यकमाची सांगता झाली.
तुमको देखा तो ये खयाल आया... मैफल रंगली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 10:04 PM