नाशिक : महापालिकेच्या सफाई कामगारांच्या हजेरीसाठी सेल्फीचा वापर करण्याच्या आयुक्तांच्या कल्पनेला पहिल्याच दिवशी काही ठिकाणी प्रतिसाद मिळाला, तर काही ठिकाणी कामगारांनी विरोध केल्याने सेल्फी काढता आले नाही. दरम्यान, आयुक्तांनी सफाई कामगारांच्या बदल्यांबाबत समर्थन केले असून, केवळ चाळीस-बेचाळीस कर्मचाºयांच्या अडचणी आहेत, त्यातील गांभीर्य बघून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. महा- पालिकेच्या सफाई कामात शिस्त आणण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काही निर्णय घेतले आहेत. त्यानुसार त्यांनी सफाई कामगार म्हणून नियुक्त परंतु अन्यत्र काम करणाºया कर्मचाºयांना मूळ खात्यात परत आणले. तसेच त्यांच्या बदल्याही केल्या आहेत. सकाळी ६ वाजता हजर राहण्याच्या आदेशाबाबतही अनेकांची नाराजी आहे. या प्रकारामुळे सफाई कामगारांच्या संघटना नाराजी व्यक्त करीत असून, दररोज कोणती ना कोणती संघटना निवेदन देत आहे. त्यातच सर्व विभागांत सफाई कामगारांची सेल्फी हजेरी घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार सकाळी अनेक हजेरी शेडवर सेल्फीचे प्रयत्न झाले. तथापि, काही ठिकाणी त्यांना प्रतिसाद मिळाला, तर काही ठिकाणी मिळू शकला नाही. बदल्यांचे समर्थन सफाई कामगारांच्या सेल्फीबाबत आढावा घेतला जाईल, असे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले. सफाई कर्मचाºयांच्या बदल्यांचे मात्र त्यांनी समर्थन केले. यासंदर्भात कामगार संघटनांच्या तक्रारी असल्या तरी खूप काम- गारांना त्याचा त्रास झाला असे नाही. चाळीत से बेचाळीस कामगारांच्या बाबतीत प्रश्न आहेत. त्यातील तक्रारींबाबत प्रत्यक्ष वस्तुस्थिती जाणून घेऊन फेरबदल करता येऊ शकतील, त्यात अडचणीचे काहीच नाही, असे आयुक्तांनी सांगितले.
हजेरीच्या सेल्फीबाबत कुठे वाद, कुठे प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2018 12:48 AM