नाशिक : नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांची हीच ती आर्मस्ट्राँग कंपनी जी कोणत्या पैशातून खरेदी केली? तसेच ज्या कंपनीत एक युनिटही ग्रीन एनर्जी निर्माण झाली नाही, त्या कंपनीने गिरणा साखर कारखाना कोणत्या पैशातून विकत घेतला? असा सवाल करीत माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आर्मस्ट्राँग एनर्जी प्रा. लि. या कंपनीची बाहेरून पाहणी करीत अनेक सवाल उपस्थित केले.
सोमय्या यांनी भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बुधवारी सकाळी नाशिक-औरंगाबाद रस्त्यावरील शिलापूरच्या आर्मस्ट्राँग या कंपनीची पाहणी केली. आर्मस्ट्राँगच्या नावाने भुजबळांनी काळा पैसा व्हाईट केला आहे. मेसर्स आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने कोणतीच उलाढाल, निर्मिती न करता १७ कोटी ८२ लाख ५५ हजार १० रुपयात मालेगावचा गिरणा सहकारी साखर कारखाना कसा विकत घेतला? तो पैसा कुठून आला असा सवालदेखील सोमय्या यांनी उपस्थित केला. मोदी सरकारने जी बेनामी मालमत्ता जप्तीची कारवाई केली, ती जर चुकीची असेल तर संबंधितांनी ती चूक दाखवून देण्याचे खुले आव्हानदेखील सोमय्या यांनी दिले. भुजबळ यांच्या सोमय्या यांनी स्वतः ट्विटरवर मंगळवारी मी बुधवारी सकाळी भुजबळांच्या आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चरची पाहणी करणार असल्याचे जाहीर केल्याप्रमाणे बेहिशेबी मालमत्तेची पाहणी केली. भुजबळ यांची १०० कोटी रुपयांची बेनामी मालमत्ता आयकर विभागाने जप्त केल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. यावेळी सोमय्या यांच्यासमवेत भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो
पीएचजेएयु ७० ते ७४
शिलापूरच्या आर्मस्ट्राँग कंपनीची पाहणी करताना भाजपचे नेते किरीट सोमय्या. (छाया : राजू ठाकरे)