संजय पाठक नाशिकपोलीस आयुक्तांनी आल्या आल्याच वाहतुकीचा प्रश्न हाती घेतल्याचे दाखवत शहरात कुठेही उभी राहणारी वाहने उचलण्यासाठी टोर्इंग सुरू करण्याची तयारी केली असून, तशी कार्यवाही अलीकडेच सुरूही केली आहे. वाहतुकीच्या शिस्तीविषयी कोणाचे दुमत नाही, परंतु वाहने येथे उभी करू नये, असे ठिकठिकाणी फलक लागले असताना मग वाहने उभी कोठे करायची याचा तिढा न सोडविताच ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील पार्किंगची म्हणजेच वाहनतळाची समस्या कशी सुटणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.कोणतीही गोष्ट करताना जेव्हा ती करायची नाही, असे कटाक्षाने अथवा नियमाचा धाक दाखवून सांगितले जाते, त्याचवेळी मग काय करावे, असा विकल्पही दिला पाहिजे. परंतु वाहतुकीच्या बाबतीत नेमके याच्या उलट धोरण असून एखादी गोष्ट करायची नाही म्हणजे नाही, हे सांगतानाच मग काय करावे, हे स्पष्ट केले जात नाही. शहरात विविध ठिंकाणी नो पार्किंगचे फलक लावून तेथे उभी केलेली वाहने उचलण्याआधी त्याच्या आसपास वाहनतळ कुठे याची तर माहिती व्हायला हवी; परंतु तसे होत नाही.नाशिक शहराची लोकसंख्या मुळातच वीस लाख आणि वाहनांची संख्या केवळ दुचाकीचा विचार केला ुतरी पाच लाख इतकी आहे. इतक्या मोठ्या संख्येने शहर वाढत असताना आणि वाढत्या वसाहतीच्याच ठिकाणी रस्त्यावरील बाजार सुरू होत असताना तेथे वाहनतळाचे कोणते नियोजन नाही, अशी शेकडो ठिकाणे आहेत. २६४ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या नाशिक शहरात वाहनतळांची संख्या अवघी ११ इतकी आहे. म्हणजे या अधिकृत आणि सशुल्क वाहनतळाचा भाग सोडला, तर कोठेही वाहने उभी करणे कायद्याने गैर ठरविले आहे. म्हणजेच शहरात एकाच वेळी लागलेली हजारो वाहने ही नो पार्किंगमध्ये उभी असतील तर त्याचे अपश्रेय कोणाचे, नागरिकांचे की पोलीस आणि पालिकेचे? (प्रतिनिधी)
वाहने लावायची तरी कुठे ?
By admin | Published: January 02, 2016 11:44 PM