नाशिक : महापालिका निवडणुकीची माघारीची मुदत संपल्यामुळे प्रभागातील चित्र स्पष्ट झाले असून, उमेदवारांनी प्रचाराला सुरुवातही केली आहे. प्रचारासाठी अनेक फंडे वापरताना सध्याच्या आधुनिक युगात सोशल माध्यमाचा चांगलाच उपयोग उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी करून घेण्यास सुरुवात केली आहे. स्वत:चा प्रचार करण्याबरोबरच प्रतिस्पर्धी राजकीय पक्ष व उमेदवारांच्या खिल्ल्याही त्यातून उडविल्या जात आहेत. निवडणूक यंत्रणा भले कितीही सोशल माध्यमावरून केल्या जाणाऱ्या प्रचारावर लक्ष ठेवून असल्याचा दावा करीत असली तरी, होत असलेला प्रचार पाहता, मतदारांचे चांगलेच मनोरंजन होत आहे. भाजपाच्या प्रचाराला उत्तर देताना- ‘नुसते मोदी मोदी करून विनाकारण भाजपाच्याच उमेदवारांना मते देऊ नका. मोदी साहेबांची गरज देश चालवायला आहे. नगरपालिका चालवायला नाही. त्यामुळे पक्ष प्रेम बाजूला ठेवून तुमच्या विभागातील प्रामाणिक व स्वच्छ प्रतिमा असलेल्या उमेदवारालाच मते देऊन निवडून द्या.’ - एक हितचिंतक शिवसेनेच्या भूमिकेवर संशय असलेला मतदार म्हणतो- ‘मी शिवसेनेला मतदान करेन, जर उद्धव ठाकरे परिवारासह आपले आमदार, खासदार घेऊन बाळासाहेबांच्या समाधीवर हात ठेवून शपथ घेतील की, भाजपासोबत यापुढे युती करणार नाही, तेव्हाच मी म्हणेल माझं मत शिवसेनेला.’ उमेदवारीसाठी सर्वच पक्षांचे उंबरठे झिजविलेल्या उमेदवाराला उद्देशून- ‘असाल तसे निघून या, कुणीही रागावणार नाही उमेदवारी अर्ज भरून झाले असतील तर असाल तसे घरी निघून या, तुम्ही गेल्यापासून आईने अन्नाचा एक घास शिवलेला नाही... जाताना शिवसेनेत होतात, नाक्यावरपर्यंत गेलात तेव्हा बीजेपीत गेल्याची ब्रेकिंग न्यूज पाहिली, दुपारी राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाल्याचे कळाले. तीन वाजता कॉँग्रेसकडून फॉर्म भरताना दिसलात... आता कोणत्या पक्षात आहात ते घरी आल्यावर.. सांगा कोणीही रागावणार नाही. पोरं बिच्चारे... सर्व पक्ष कार्यालये शोधत आहेत...’ निवडणुकीच्या प्रचारात वैर निर्माण होऊ नये म्हणून- ‘नाशिक महापालिका निवडणूक आली आहे, सर्वसामान्य छोट्या अतिउत्साही कार्यकर्त्यांना विनंती आहे, तावातावात जास्त लोड घेऊ नका. आपल्या लोडची किंमत फक्त निवडणूक होईपर्यंतच असते. मतदान ज्याला करायचं आहे त्याला करा पण एकमेकांना गुच्च्या घालून स्वत:ची डोकी फोडून घेऊ नका. दोन दिवस साहेब ढाब्यावर नेतील पुन्हा घरची ताटली आणि तांब्या आहे, हे विसरू नका. निष्ठा हा रोग कायमचा नष्ट झालेला
कुठे प्रचार तर कुठे खिल्ली सोशल माध्यम ठरले प्रभावी
By admin | Published: February 09, 2017 3:26 PM