वाडीव-हे : नाशिक - मुंबई महामार्गावर वाडीव-हे फाट्याजवळील तळ्यासमोर अज्ञात वाहनाच्या धडकेत सोमवारी रात्री बिबट्या ठार झाला. महामार्गालगत असलेल्या लष्कराच्या तोफखाना प्रशिक्षण केन्द्राची हजारो एकर पडीत जमिन आहे. पडीत जमिनीत मोठ्या प्रमाणात नैसर्गिक जंगल संवर्धन झाले आहे. या जंगलात नैसर्गिक निवारा असल्याने जंगली श्वापदे, बिबटे नेहमी आसरा घेतात. हे प्राणी अन्न पाण्यासाठी भटकंती करत असतांना नागरी वस्तीकडे येत असतात. इकडे येण्यासाठी महामार्ग ओलांडावा लागतो. अशाच रस्ता ओलंडण्याच्या प्रयत्नात असतांना काल रात्री ८.३० वाजेच्या दरम्यान आज्ञात वहानाच्या धडकेत बिबट्या ठार झाला. सदर बिबटया कमी वयाचा असल्याचे समजते. दुचाकीवर येत असलेल्या दुचाकी स्वारांच्या लक्षात ही बाब आल्याने महामार्गावरील वाहने मृत बिबटयावरून जाऊ नये म्हणुन बिबट्याला महामार्गावरून उचलुन रस्त्याच्या बाजूला ठेवला. याची माहिती मिळताच वाडीव-हे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास देशमुख व कर्मचारी तसेच वनविभागाचे वनक्षेत्रपाल देशपांडे,भाऊसाहेब राव,ढोमसे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला.
वाडिवºहेजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबटया ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 5:43 PM