१६ पुरुष सुक्तद्वारे महापूजन करण्यात आले. प्रारंभी माता सीता देवीला पांढरे वस्त्र झगा पोषाख व साडीचोळी नेसविली त्यानंतर प्रभू राम व लक्ष्मणाला फेटा बांधण्यात आला.
प्रभू रामचंद्राला फेटा बांधण्याची परंपरा पुजारी घराण्याच्या वारसांकडून गेल्या अनेक वर्षांपासून अखंड पालन केली जात आहे. वर्षातील ११ महिन्यातील सर्व एकादशीच्या दिवशी देवाला पितांबर नेसविले जाते. तर फक्त फाल्गुन मासात उन्हाळा असतो उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी शुभ्र पांढरे वस्त्र असते. गुरुवारी सकाळी धनंजय पुजारी, मुकुंद पुजारी यांनी विधी पार पाडला. होळी सणाच्या दिवशी गुलाल उधळून व रंगपंचमीला केशर व पळसाच्या फुलांचा रंग उकळून त्याचा रंग आगामी काळात येणाऱ्या वासंतिक नवरात्र उत्सवात यंदाचे उत्सव मानकरी विलासबुवा पुजारी यांच्या हस्ते श्रींच्या वस्त्रावर रंग, गुलाल टाकून उत्सवाला प्रारंभ केला जाईल. (फोटो २५ राम)