शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
3
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
4
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
6
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
7
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
8
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
9
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
10
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
11
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
12
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
13
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
14
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
15
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
17
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
18
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
19
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
20
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!

व्हाइटनर नशेतून गुन्हेगारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 12:02 AM

‘व्हाइटनर गॅँग’मधील अल्पवयीन मुलांना या नशेतून आणि त्यांच्याकडून होत असलेल्या गुन्हेगारीतून कसे बाहेर काढावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. वडाळागाव आणि राजीवनगर झोपडपट्टीतील व्हाइटनर गँगच्या दहशतीमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.

संजय शहाणे।इंदिरानगर : ‘व्हाइटनर गॅँग’मधील अल्पवयीन मुलांना या नशेतून आणि त्यांच्याकडून होत असलेल्या गुन्हेगारीतून कसे बाहेर काढावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. वडाळागाव आणि राजीवनगर झोपडपट्टीतील व्हाइटनर गँगच्या दहशतीमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.  वडाळागावातील सावित्रीबाई फुले झोपडपट्टी, पिंगुळी बाग, अण्णा भाऊ साठेनगर, मेहबूबनगर यांसह परिसरात आणि राजीवनगर झोपडपट्टी परिसरात व्हाइटनर गँगमध्ये अल्पवयीन मुलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. दोन्ही ठिकाणी झोपडपट्टी परिसर असल्याने उदरनिर्वाहासाठी हातावर काम करण्याची लोकवस्ती म्हणून ओळखली जाते. आई-वडील सकाळी मोलमजुरीसाठी घराबाहेर निघून गेल्यानंतर लहान मुले घरात एकटीच असतात. याचाच फायदा काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी घेऊन मुलांना व्हाइटनरसारख्या नशेच्या सवयी लावल्या आहेत. या मुलांचा गुन्हेगारीसाठी वापर करण्यास मोठ्या प्रमाणात सुरुवात केल्याचे निदर्शनास आले आहे  या झोपडपट्ट्यांतील अल्पवयीन मुलांना व्हाइटनरची नशा केल्यानंतर कोणत्याही प्रकारची शुद्ध नसते. त्यामुळे त्यांना गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक जे सांगतात ते करण्यास ते राजी होत आहेत. त्यामुळे परिसरात भुरट्या चोºया आणि घरफोडीच्या घटना नियमित घडत आहेत. ही मुले रस्त्याने ये-जा करताना लहान मुली, युवती व महिलांची छेडछाड करत आहेत. त्यामुळे परिसरात व्हाइटनर गँगची दहशत दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.   व्हाइटनर नशा करणाºया अल्पवयीन मुलांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. व्हाइटनर गँगच्या अल्पवयीन मुलांना गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक व्हाइटनर कोठून आणून देतात हासुद्धा प्रश्न आहे. कारण स्टेशनरी दुकानांमधून व्हाइटनर सहजासहजी विक्री केले जात नाही. त्यामुळे ही मुले ते कुठून मिळवतात, असा प्रश्न निर्माण झाला आहे.  अल्पवयीन मुले असल्याने पोलिसांना फार कडक भूमिका घेता येत नाही. व्यसन करून गुन्हा केलेल्यास रंगेहाथ पकडल्यावर पोलिसांना त्यांचा ताबा रिमांड होमकडे द्यावा लागतो. त्या ठिकाणी सदर मुलांचे पालक बॉण्ड लिहून त्यांना सोडवून घेतात. सदर मुले परिसरात पुन्हा गुन्हेगारी कृत्य करण्यास मोकळे होतात.

टॅग्स :PoliceपोलिसCrimeगुन्हा