शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अ.भा.म. साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड
2
"सरदार पटेलांचा पुतळा पूर्ण झाला पण..."; संभाजीराजे छत्रपतींनी स्पष्टच सांगितलं
3
Gold Investment: दागिने घेण्याऐवजी सोन्यामध्ये 'या' 5 प्रकारे करा गुंतवणूक; मिळेल भरपूर रिटर्न
4
पाक विरुद्ध हरमनप्रीत कौरनं खेळली 'ही' चाल; या खेळाडूची प्लेइंग इलेव्हनमध्ये एन्ट्री
5
संजय राऊतांना पवित्र करण्यासाठी अयोध्याला पाठवू; अब्दुल सत्तारांची बोचरी टीका
6
'भारत एक हिंदू राष्ट्र, आपल्या सुरक्षिततेसाठी...; सरसंघचालक मोहन भागवत यांचं हिंदूंना मोठं आवाहन
7
"स्मारकाच्या कामात स्थगिती आणणाऱ्या काँग्रेसच्या वकिलांचाही..."; संभाजीराजे छत्रपतींना फडणवीसांचा सल्ला
8
तिलक वर्मा की नितीश रेड्डी? मयंक यादव की रवी बिश्नोई? आकाश चोप्राने निवडली टीम इंडियाची Playing XI
9
तरुणाच्या आत्महत्येला मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री जबाबदार; मनोज जरांगेंनी काय दिला इशारा?
10
"..तर मी स्वतः पीएम नरेंद्र मोदींसाठी प्रचार करेन", अरविंद केजरीवालांचे मोठे वक्तव्य
11
Maharashtra Elections 2024: दादाजी भुसेंविरोधात उद्धव ठाकरेंचा उमेदवार ठरला!
12
चेंबूर आग दुर्घटनेची होणार सखोल चौकशी; मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख देण्याची CM शिंदेंची घोषणा
13
सुवर्णसंधी! ONGC मध्ये 2 हजारांहून अधिक अप्रेंटिस भरती, स्टायपेंड किती मिळणार? पाहा...
14
Beed: चिमुरडीने फोटो बघितला अन् बलात्कारी शिक्षकाला पोलिसांनी केली अटक
15
Israel-Hamas war : हिजबुल्लाहने सेल्सगर्लवर विश्वास ठेवून केली चूक; झाला मोठा घात, इस्त्रायल १० वर्षापासून पेजरवर काम करत होते
16
अजित पवारांना बसणार मोठा झटका! 'तुतारी हाती घ्यायची का?', रामराजेंना कार्यकर्त्यांनी दिला 'होकार'
17
"पिझ्झा घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जाता, ही मस्ती घरी दाखवायची"; सुप्रिया सुळेंची सुनील टिंगरेंवर जहरी टीका
18
"मोदींनी भाषण करण्यापूर्वी थोडा..."; संजय राऊतांनी पंतप्रधानांना पाटील, राठोडांवरून घेरलं
19
धक्कादायक! श्री रामची भूमिका साकारताना स्टेजवरच हृदयविकाराचा झटका, लाइव्ह परफॉर्मन्स दरम्यान मृत्यू झाला
20
गाझातील मशिदी आहेत 'हमासचा अड्डा'? इस्रायल बनवतोय निशाणा, एअर स्ट्राइकमध्ये अनेकांचा मृत्यू

अल्पवयीनांभोवती व्हाइटनर नशेचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 12:29 AM

परिसरात अल्पवयीन मुलांभोवती व्हाइटनरच्या नशेचा विळखा दिवसेंदिवस वाढत चालला असून, अशी नशा करणाऱ्यांची व्हाइटनर गॅँग तयार झाल्यामुळे परिसरातील गुन्हेगारीतही वाढ होत आहे.

इंदिरानगर : परिसरात अल्पवयीन मुलांभोवती व्हाइटनरच्या नशेचा विळखा दिवसेंदिवस वाढत चालला असून, अशी नशा करणाऱ्यांची व्हाइटनर गॅँग तयार झाल्यामुळे परिसरातील गुन्हेगारीतही वाढ होत आहे. परिसरातील काही विकृत प्रवृत्तींकडून कामगार वस्त्यांमध्ये दिवसा एकट्या राहणाºया अल्पवयीन मुलांना लक्ष करून या नशेच्या विळख्यात अडकवून हे नशेचे रॅकेट चालविलेचा असून, यातून मुलांना बाहेर कसे काढावे? असा प्रश्न पालकांसह पोलिसांसमोरही निर्माण झाला आहे.वडाळागाव, भारतनगर, राजीवनगर झोपट्टीतील व्हाइटनर गँगच्या दहशतीमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. वडाळागावातील, घरकुल योजना पिंगुळी बाग, अण्णा भाऊ साठेनगर, मेहबूबनगर, गुलशननगर, भारतनगर, मुमताजनगर, राजीवनगर झोपडपट्टी परिसरात व्हाइटनरची नशा करणाºया अल्पवयीन मुलांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. या भागातील वसाहत उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी आणि मिळेत ते काम करणाऱ्यांची लोकवस्ती म्हणून ओळखली जाते. त्यामुळे घरातील आई-वडील सकाळी मोलमजुरीसाठी घराबाहेर निघून गेल्यानंतर लहान मुलेच घरात असतात याचाच फायदा काही गुन्हेगारी प्रवृतीच्या विकृत गुन्हेगारांनी घेऊन त्यांना व्हाइटनर नशेच्या जाळ्यात ओढण्यासोबतच नशेच्या विळख्यात सापडलेल्या अशा अल्पवयीन मुलांकडून त्यांचा गुन्हेगारीसाठी वापर होत आहे.गुन्हेगारीत वाढव्हाइटनरची नशा केल्यानंतर विचारक्षमता संपुष्टात येत असल्याने त्यांना गुन्हेगारीसाठी प्रवृत्त केले जाते. त्यामुळे परिसरात भुरट्या चोºया आणि घरफोडीच्या घटना नियमित घडत असतात. या गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी पोलिसांकडून व्हाइटनर गँगच्या अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन बाल सुधारगृहात पाठवले जाते. परंतु काही दिवसांतच ही मुले बाहेर येताच त्यांना या जाळ्यात ओढण्यासाठी व्हाइटनर नशेचे रॅकेट चालविण्यासाठी सक्रिय होतात.कारवाईला अडचणव्हाइटनरच्या नशेत अडकलेली बहुतांश मुले हे अल्पवयीन असल्याने पोलिसांना कारवाई करण्यास अडचण निर्माण होते. या अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना रिमांडहोममध्ये पाठविण्यात येते. त्या ठिकाणी त्यांचे पालक प्रतिज्ञापत्र लिहून त्यांना सोडवून घेतात. परंतु, पुन्हा ही मुले व्हाइटनरसह वेगवेगळ्या नशेच्या विळख्यात अडकून गुन्हेगारी कृत्यांकडे वळत असल्याने परिसरातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे.खुनाच्या गुन्ह्यातही सहभागाची शक्यतापेठेनगर परिसरात दहा दिवसांपूर्वी मोकळ्या मैदानातील विहिरीत एका अल्पवयीन मुलास तीन अल्पवयीन मुलांनी नायलॉन दोरीने गळा आवळून फेकून दिल्याची घटना घडली होती. ते तिघेही संशयित व्हाइटनरनशेच्या आहारी गेल्याचे समजते. त्यामुळे परिसरात व्हाइटनर गँगची दहशत दिवसें दिवस वाढतच चालली असून, त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची तसेच कारवाईची मागणी इंदिरानगर,पेठेनगर आदी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

टॅग्स :PoliceपोलिसNashikनाशिक