नाशिक : थेट विमानतळावरच सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात आॅर्केस्ट्रा आणि मद्यप्राशनाचा प्रकार गंभीर असून, विमानतळाबाबत राष्ट्रीय सुरक्षेबाबत तसेच हवाई प्राधिकरणाचे वेगळे कायदे असताना पोलिसांनी केवळ सार्वजनिक शांततेच्या भंगाचा व रात्री उशिरा वाद्यवाजविल्याबाबत गुन्हा दाखल केलेला असून, मुळात विमानतळाबाबत राष्ट्रीय सुरक्षेचे व हवाई प्राधिकरणाचे नियम कठोर असताना त्याबाबत संबंधितांवर काहीच कारवाई करण्यात आलेली नसल्याने यामागे एका मोठ्या नेत्याचे नाव आता दबक्या आवाजात घेतले जात आहे. मुळातच विमानतळावर हा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम घेण्याबाबत परवानगीसाठी केंद्र व राज्य सरकारशी निगडीत असून, त्याबाबत स्थानिक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना अशी परवानगी देता येते काय? आणि ज्यांनी ही परवानगी दिली त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा विषयक व हवाई प्राधिकरणाच्या नियम व कायद्यान्वये कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. प्रत्यक्षात गुन्हे दाखल, मात्र सार्वजनिक शांततेच्या भंगाचेच झाल्याचे याप्रकरणी दिसून आले आहे. इतकेच कशाला विमानतळावर छोटेखानी ‘क्लब हाऊस’च्या नावाखाली मद्य पिण्याचा दिलेला एक दिवसाचा परवाना देण्याची कार्यवाही सुद्धा अशीच संशयाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले बांधकाम विभागाचे अधिकारी, बिल्डर्स संघटनेचे पदाधिकारी व मक्तेदार यांच्या वाहनांचे क्रमांक स्थानिक ग्रामस्थांनी घेतले असून, पोलिसांनी या वाहनक्रमांकानुसारच संबंधित बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची कारवाई अपेक्षित होती.
पडद्याआडचे मोठे मासे कोण? नाशिक विमानतळ साग्रसंगीत पार्टी प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा बाजूला, वाहनक्रमांकाचे रहस्य
By admin | Published: February 04, 2015 1:39 AM