शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

चुरशीच्या लढतीत मतविभागणीचा लाभ कुणाला?

By admin | Published: February 16, 2017 1:26 AM

चुरशीच्या लढतीत मतविभागणीचा लाभ कुणाला?

 पंकज पाटील उपनगरचार विद्यमान नगरसेवक आणि सहा माजी नगरसेवकांचे राजकीय भवितव्य उपनगर-टाकळी परिसरातील प्रभाग क्रमांक १६ मध्ये ठरणार आहे. ताकदवार उमेदवार आमने-सामने आल्याने प्रभागात चुरशीचा सामना बघायला मिळणार असून, मतविभागणीचा लाभ नेमका कुणाला होतो, यावर सारे विजयाचे समीकरण अवलंबून असणार आहे.नव्याने झालेल्या प्रभागरचनेत विस्तारलेला प्रभाग क्रमांक १६ यावेळी राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारी करणाऱ्यांसाठी दमछाक करणारा ठरत आहे. महापालिका निवडणुकीत अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून मनसेच्या विद्यमान नगरसेवक मेघा साळवे यांच्यासमोर भाजपाच्या माजी नगरसेवक उज्ज्वला हिरे यांचे मुख्यत्वे आव्हान असले तरी राष्ट्रवादीच्या सुषमा रवि पगारे यांच्या उमेदवारीने या गटातील लढत रंगतदार होणार आहे. सुषमा पगारे यांनी गेल्यावेळी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. शिवसेनेने तिकीट नाकारल्याने त्यांना राष्ट्रवादीने चाल दिली आहे. याच गटात शिवसेनेचे विभागप्रमुख आशिष साबळे यांच्या पत्नी विद्या साबळे रिंगणात आहेत. याशिवाय, बसपाच्या अरुणा उघाडे व अपक्ष माधुरी भोळे, कोमल साळवे हे उमेदवार आहेत. अनुसूचित जमाती महिला प्रवर्गातून शिवसेनेकडून विद्यमान नगरसेवक नंदिनी जाधव रिंगणात आहेत. यापूर्वी, सातपूर भागातून माकपाकडून निवडून गेलेल्या नंदिनी जाधव यांनी नंतर पक्षांतर करत सेनेत प्रवेश केला होता. याच गटात भाजपाकडून रूपाली थविल, कॉँग्रेसकडून आशा रफीक तडवी, मनसेकडून हेमलता कडाळे, बसपाकडून अनुजा धराडे तसेच पाच अपक्ष उमेदवार आहेत. त्यात माजी नगरसेवक सविता गायकवाड यांचा समावेश आहे. जाधव यांना थविल, तडवी यांचे आव्हान असेल. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातून भाजपाकडून माजी नगरसेवक अनिल ताजनपुरे, सेनेकडून सुनील जाधव, राष्ट्रवादीकडून ज्योती जोंधळे, मनसेकडून नीलेश सहाणे, बसपाकडून सविता केदारे यांच्यासह दोन अपक्ष उमेदवार आहेत. कॉँग्रेसच्या बंडखोर उमेदवार व माजी नगरसेवक वंदना मनचंदा या अपक्ष उमेदवारी करत आहेत. या गटात भाजपा व राष्ट्रवादीत लढत शक्य आहे. सर्वसाधारण गटात चुरशीचा सामना होत आहे. या गटात माजी महापौर अशोक दिवे यांचे सुपुत्र व नगरसेवक राहुल दिवे, भाजपाचे नगरसेवक प्रा. कुणाल वाघ, शिवसेनेकडून माजी नगरसेवक विजय ओहोळ, अपक्ष म्हणून माजी नगरसेवक रमेश जाधव, बसपाकडून प्रमोद भालेराव यांच्यासह दोन अपक्ष उमेदवार आहेत. या गटात तिरंगी लढत होत आहे. चारही गटात ताकदवार उमेदवार असल्याने आणि प्रादेशिकतेचाही मुद्दा महत्त्वपूर्ण ठरणार असल्याने मतविभागणीचा नेमका लाभ कुणाला होतो, याकडे लक्ष लागून असणार आहे.