शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

नाशिकचा खासदार कोण? ; मतदारराजा आज देणार महाकौल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 1:15 AM

। नाशिक । लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यातील नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघांसाठी सोमवारी (दि.२९) मतदान घेण्यात येणार ...

नाशिक । लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यातील नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघांसाठी सोमवारी (दि.२९) मतदान घेण्यात येणार असून, त्यासाठी प्रशासनातर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे. निवडणुकीत नाशिक लोकसभा मतदारसंघातून १८ उमेदवार नशीब आजमावत असून, त्यात शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे, राष्टÑवादीचे माजी खासदार समीर भुजबळ, वंचित बहुजन आघाडीचे पवन पवार, बहुजन समाज पार्टीचे वैभव आहिरे, अपक्ष माणिकराव कोकाटे आदींचा समावेश आहे. सोमवारी सकाळी ७ वाजता मतदानाला प्रारंभ होणार असून, ६ वाजता मतदान पूर्ण होईल. त्याची प्रशासकीय तयारी पूर्ण होऊन मतदान केंद्रावर साहित्य रवाना करण्यात आले आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.मतदार यादीत नाव कसे शोधाल?https://ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर गेल्यानंतर डाव्या बाजूला दिलेल्यालिंकवरील इलेक्ट्रोल सर्ज इंजिनवर क्लिक करा.नावानुसार आणि आयडी कार्डनुसार इथे नाव तपासता येते.नावानुसार तपासायचे असेल तर त्यावर क्लिक केल्यानंतर जिल्ह्यानुसार किंवा विधानसभानुसार असे दोन पर्याय दिले आहेत.विधानसभा मतदारसंघानुसार नाव तपासायचे असेल तर त्यावर क्लिक करावे. जिल्हा, मतदारसंघ, नाव अशी माहिती टाकल्यानंतर सर्चवर क्लिक केल्यानंतर यादीतील तुमचे नाव दिसेल.https://www.nvsp.in या संकेतस्थळावर गेल्यानंतर सर्च यूवर नेम इन इलेक्टोरल रोलवर क्लिक करा. राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टल में आपका स्वागत हैं, असे वाक्य झळकेल.मतदान केंद्राची माहिती जाणून घेऊ शकता.  या माहितीची प्रिंटही काढता येते.मतदार यादीत नाव नोंदविणे, नाव शोधणे,  नावात पत्त्यात बदल करण्यासाठी अर्ज करू शकता.बीएलओची माहितीही मिळू शकेल. निवडणूक अधिकाऱ्याची माहितीही यावर उपलब्ध आहे. कंटिन्यू या लिंकवर क्लिक केल्यानंतर दोन पद्धतीने नाव शोधण्याची सुविधा उपलब्ध आहे. नाव, वय, जन्मतारीख, राज्य, जिल्हा, जिल्हा विधानसभा क्षेत्र ही माहिती टाकल्यानंतर मतदार यादीत नाव शोधता येते. यासह मतदार ओळखपत्र क्रमांक टाकूनही नाव शोधता येते.मतदारांसाठी २४१८ व्हीव्हीपॅटलोकसभा निवडणुकीत पारदर्शी मतदान व्हावे, यासाठी प्रथमच दोन हजार २४१८ व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरीफायबल पेपर आॅडिट्रेल) यंत्रांचा वापर केला जाणार आहे. यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. मतदान केल्यानंतर सात सेकंदांमध्ये मतदाराला पावती मिळेल. त्यावर निवडणूक चिन्ह, नाव व उमेदवाराचा मतपत्रिकेतील अनुक्रमांक नमूद असेल. या पावतीमुळे मतदाराने दिलेल्या मताची खात्री करणे शक्य आहे.१८६ केंद्रांतून होणार लाइव्ह कास्टनाशिक लोकसभा क्षेत्रातील एकूण मतदान केंद्रापैकी १८६ केंद्रांतील मतदान प्रक्रिया थेट लाइव्ह बेव कास्ट करण्यात येणार आहे. या केंद्रातील हालचालींवर निवडणूक आयोग थेट लक्ष ठेवणार आहे. विशेष म्हणजे, सदर लाइव्ह कॉस्ट केवळ निवडणूक विभागच बघू शकणार आहे.सायंकाळी ६ पर्यंत रांगेत असलेल्यांना करता येणार मतदानमतदानाच्या दिवशी सायंकाळी ६ वाजेपर्यंत रांगेत लागता येईल. रांगेत असलेल्या शेवटच्या मतदारापर्यंत टोकन दिले जाईल. रांगेतअसलेल्या त्या मतदाराचे मतदान होईपर्यंत मतदानाची प्रक्रिया चालेल. त्यानंतरकुणालाही मतदान करता येणार नाही.जीपीएस यंत्रणा असलेल्या  कंटेनरने ईव्हीएम पोहोचविणारमतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रत्येक मतदान केंद्रातील ईव्हीएम मशीन सील करून त्या आपापल्या विधानसभानिहाय स्ट्राँग रूमवर आणल्या जातील. तिथे पुन्हा व्यवस्थित तपासणी होऊन सर्व ईव्हीएम एका कंटेनरमध्ये भरून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत अंबडच्या सेंट्रल वेअर हाउसमधील स्ट्राँग रूममध्ये पोहोचविल्या जातील.संवेदनशीलमतदारसंघनाशिक पश्चिम विधानसभा-विद्या निकेतन हायस्कूल, रायगडचौक, लोकनेते व्यंकटराव हिरे विद्यालय, पवननगर; नाशिक ग्रामोदय एज्युकेशन सोसायटी, जुने सिडको, देवळाली मतदारसंघ- विहितगाव मनपा शाळा, इगतपुरी विधानसभा मतदारसंघ- गोलदरी गाव, वाडीवºहे सेकंडरी विद्यामंदिर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तीन लकडी इगतपुरी, जनता विद्यालय, इगतपुरी, सिन्नर मतदारसंघ- सोमठाणे जिल्हा परिषद शाळा, नाशिक पूर्व मतदारसंघ- नांदुरगाव मनपा शाळा, मनपा शाळा नंबर ४९ पंचक, नाशिक मध्य मतदारसंघ- मराठा हायस्कूल, महर्षी शिंदे विद्यालय, रचना विद्यालय, बी. डी. भालेकर हायस्कूल, मनपा शाळा क्रमांक ३९ नागझरीकोण आहेत उमेदवार?उमेदवाराचे नाव पक्षहेमंत गोडसे शिवसेनासमीर भुजबळ राष्टÑवादीवैभव आहिरे बीएसपीसोनिया जावळे आयटीपीपवन पवार वंचित आघाडीविनोद शिरसाठ हिजपासंजय घोडके बीआरसीशरद आहेर अपक्षप्रकाश कनोजे अपक्षसिंधूबाई केदार अपक्षमाणिकराव कोकाटे अपक्षदेवीदास सरकटे अपक्षधनंजय भावसार अपक्षप्रियंका शिरोळे अपक्षविलास देसले अपक्षशरद धनराव अपक्षसुधीर देशमुख अपक्ष

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnashik-pcनाशिक