शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
2
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
3
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
5
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
6
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
7
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
8
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
9
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
10
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
12
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
13
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
14
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
15
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
16
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
17
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
18
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
19
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
20
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 

असा ‘मूर्खासारखा’ विचार कोण कशाला करेल बरे?

By admin | Published: August 06, 2016 12:30 AM

असा ‘मूर्खासारखा’ विचार कोण कशाला करेल बरे?

 हेमंत कुलकर्णी नाशिक‘मध्यंतरी राज्य सरकारने मूर्खासारखा निर्णय घेऊन अनधिकृत बांधकामे अधिकृत केल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली’, असे या राज्यातील बव्हंशी शहरांना जर्जर करुन सोडलेल्या रोगाचे हुकुमी निदान राज ठाकरे यांनी नक्की केले आहे. किती छान नाही? अत्यंत जटील, गुंतागुंतीच्या आणि बहुविध पदर असलेल्या प्रश्नांचे असे साधे सोपे आणि सरळ उत्तर कसे शोधावे, हे देशातील साऱ्याच राजकारण्यांकडून शिकण्यासारखे आहे.राज ठाकरे नाशकात आले ते मुळात त्यांनी निवडलेल्या नाशिक शहराच्या प्रथम पौराच्या घरातील सुपारी फोडण्याच्या कार्यक्रमास हजेरी लावण्यासाठी. आलोच आहोत तर जरा पुराच्या पाण्याने कोणे एकेकाळी गुलशनाबाद नावे ओळखल्या जाणाऱ्या नाशिक शहराचे कसे चिखलाबाद झाले आहे हे पाहाण्यासाठी त्यांनी त्यातल्या त्यात कोरड्या भागात फेरफटका मारला. अर्थात ते ‘किम कारणे’ नाशकात आले हे महत्वाचे नाही. मागे नितीन गडकरी आणि देवेन्द्र फडणवीस हेदेखील कुण्या घरच्या मंगल कार्यासाठी आलेच होते की. तसेही ‘कामात काम भज राम राम’ अशी म्हणदेखील उपलब्ध आहेच. तेव्हां मुद्दा तो नाही. राज ठाकरे तसे चांगल्या तालमीत तयार झालेले. चांगल्या अशा अर्थाने की मुंबई शहराचे नागरी व्यवस्थापन ज्या कुटुंबाकडे प्रदीर्घ काळापासून आहे, त्या घराण्यात आणि घरात त्यांचे बालपण सरले. त्यामुळे सरकारने जरी अनधिकृत कामांना अधिकृत करण्याचा मूर्खासारखा निर्णय घेतला असला तरी मुळात ही अनधिकृत बांधकामे उभी कोणामुळे राहिली हे त्यांच्यापरते चांगले अन्य कोण जाणू शकत असेल बरे? बांधकामाचे नकाशे तपासणे, त्यांना मंजुरी देणे, मंजुरीबरहुकुम काम केले जाते आहे वा नाही याकडे लक्ष न देणे वा साफ दुर्लक्ष करणे, नकाशात दर्शविलेल्या मजल्यांमध्ये प्रत्यक्षात केल्या गेलेल्या वा केल्या जात असलेल्या वृद्धीकडे कनवाळू नजरेने पाहाणे, हे सारे कोण करते? मंत्रालयात बसून राज्य सरकार की काय?केवळ नाशकाचेच काय घ्यायचे. राज्यातील बहुतेक सर्व लहानमोठ्या शहरांचा कारभार पाहाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बेमुर्वतखोरपणामुळे (मूर्खपणाने नव्हे हो, तो मान ठाकरे म्हणतात तसा सरकारचा!) पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी उपयुक्त ओढे, नाले, ओहोळ आणि लहान नद्या वा उपनद्या यांच्यात भर टाकून आणि निसर्गाने करुन ठेवलेल्या अशा उपायांची गळचेपी वा मुस्कटदाबी करुन जे इमले उभे राहिले आहेत आणि आजही राहात आहेत, त्यांच्यापायीच शहरांची गटारे होत आहेत. यंदाच्या पावसासारखा पाऊस आठ वर्षांपूर्वीही आला होता. पण तेव्हां जितका हाहाकार माजला त्यापेक्षा यंदा तो कैक पटींनी अधिक माजला. या आठ वर्षांपैकी निम्म्याहून अधिक काळ राज ठाकरे यांची या गावावर सत्ता आहे. या सत्तेने आधीची किती अनधिकृत बांधकामे ध्वस्त केली आणि त्यांच्या काळात कितींनी नव्याने आपले डोके वर काढले याचा शरद पवारांच्या भाषेत एकदा निकाल घ्यावाच लागेल. नाशिक शहराची सत्ता हाती लागल्यानंतर राज ठाकरे यांनी नाशिककरांना अनेक स्वप्ने दाखविली. (जीन पॅन्ट-टी शर्ट घालून ट्रॅक्टर चालविणारा शेतकरी वगैरे आठवतंय ना!) ती पूर्ण झाल्याचे त्यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीच्या काळात रेटून सांगितलेही होते. पण ‘आपण सत्तेच्या प्रारंभी जे बोललो ते यापुढे दिसायला लागेल’ असे ते आता त्यांचा येथील सत्ताकाळ जेमतेम सहा महिन्यात संपुष्टात येत असताना म्हणू लागले आहेत. ‘एक दिवस राज्याची सत्ता हातात द्या आणि मग पाहा’ हे विधान त्यांचेच ना? (चूभूदेघे) नाशकातील राज ठाकरे यांच्या कथित ‘ड्रीम प्रॉजेक्ट’मधील एक म्हणजे गोदा पार्क. गोदावरी नदीच्या काठा काठाने बांधून काढायचा जॉगींग ट्रॅक. मुंबई किंवा जिथे समुद्र आहे तिथे सीआरझेड नावाचा म्हणजे समुद्रतट नियंत्रण विभाग असा कायदा आहे आणि समुद्राच्या काठी बांधकामे करण्यावर बंदी आहे. त्या कायद्याच्या धर्तीवर आरबीआरझेड म्हणजे रिव्हर बँक रेग्युलेटरी झोन नावाचा कायदा नाही. त्यामुळे ठाकरे यांनी चक्क तिथेच हा स्वप्नाळू जॉगींग ट्रॅक नियोजित केला. अंबानी वगैरे लोकांकडून त्यासाठी पैसेदेखील आणले म्हणतात. शहरातील जाणकरांनी तेव्हांच त्याला विरोध केला होता. पण जो विरोध करतो तो शत्रू असे बाळकडूच असल्याने राज ठाकरे यांनी आपला हेका सुरु ठेवला. परवाच्या पावसाने त्या ट्रॅकच्या आणि या हेक्याच्याही चिंधड्या उडल्या. त्यावर त्यांचे म्हणणे, पूर येणार, महापूर येणार, त्यात काय एवढे? पत्रकारांनी स्वाभाविकच ट्रॅकचा विषय काढला तेव्हां ठाकरे म्हणाले, गोदापार्क उद्ध्वस्त झाला याचा आनंद मानू नका. आनंद कोण कशाला मानेल. नाशिककराना आनंद नाही वाटला. त्यांना कीव आली एकूणच हट्टीपणाची आणि पापावर पांघरुण घालण्यासाठी केल्या जाणाऱ्या केविलवाण्या धडपडीची. परिणामी शहराच्या आजच्या दुर्दशेला राज ठाकरे यांनी निवडून काढलेले कारभारी जबाबदार नाहीत असे समजण्याचा ‘मूर्खासारखा’ विचार कोण कशाला करेल बरे?