नाशिक : कालिका मंदिर ट्रस्ट आणि क्रीडा साधना यांच्या वतीने शिक्षक दिनानिमीत्त शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांच्या गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील विविध शाळा - महाविद्यालयात उत्कृष्ट काम करून विद्यार्थ्यांचा घडविण्याचे काम करणार्या ५० शिक्षकांचा गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव, जिल्हा क्र ीडा अधिकारी रविन्द्र नाईक, कालिका मंदिर संस्थानचे अध्यक्ष अण्णा पाटील, व्होकार्ड हॉस्पिटलचे प्रमुख विनोद सावंतवाडकर, स्वातंत्र्य सैनिक वसंत हुदलीकर, सुभाष तळाजिया, अशोक दुधारे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी जाधव म्हणाले, शिक्षक हा चांगला समाज घडवण्यासाठी महत्वाचा घटक आहे. आपल्याकडे पुरातन काळापासून गुरु ची परंपरा आहे, ती आजही तशीच सुरू आहे. आजही विदयार्थी आपल्या शिक्षकांनी सांगितलेच अधिक ऐकतो ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे शिक्षक घडवेल तसाच समाज घडला जातो. त्यामुळेच कोणीही व्यक्ती मोठया पदावर गेली तरीही ती व्यक्ती आपल्या गुरूचा - शिक्षकाची शिकवण कधीच विसरत नाही असे ते यावेळी म्हणाले.--इन्फो--याप्रसंगी प्राचार्या शेख चांद, मिनाक्षी पंडित, अरुण पिंगळे, सोमनाथ मुठाळ, मुख्याध्यापक कल्पना सोनावणे, भरत गांगुर्डे, सरिता देशपांडे, बाबासहेब बेरगळ यांच्याबरोबर २५ वर्षापेक्षा जास्त सेवा केलेल्या शिक्षकांचा समावेश होता. प्रास्तविक अशोक दुधारे यांनी केले. तर कार्यक्र माचे सूत्रसंचालन आनंद खरे यांनी केले. हा कार्यक्र म यशस्वी करण्यासाठी भरत पाटील, एकनाथ बिरारी, अक्षय गामणे, दीपक निकम आदिंनी परिश्रम घेतले.
उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांच्या गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2018 4:47 PM
नाशिक : कालिका मंदिर ट्रस्ट आणि क्रीडा साधना यांच्या वतीने शिक्षक दिनानिमीत्त शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांच्या गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील विविध शाळा - महाविद्यालयात उत्कृष्ट काम करून विद्यार्थ्यांचा घडविण्याचे काम करणार्या ५० शिक्षकांचा गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक ...
ठळक मुद्देकालिका मंदिर ट्रस्ट, क्रीडा साधनातर्फे शिक्षकांचा गौरव