सटाणा : येथील पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या कोरोनाबाधित ‘त्या’ वैद्यकीय अधिकाऱ्याच्या संपर्कात आलेल्या १४ कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय अहवालही निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्यामुळे सटाणेकरांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी ‘त्या’ वैद्यकीय अधिकाºयाला नेमकी कोणापासून बाधा झाली, हे शोधण्यात आरोग्य यंत्रणेला अद्याप यश न आल्याने सध्यातरी सर्वांचाच जीव टांगणीला लागला आहे.बागलाण तालुक्यात गेल्या पंधरा दिवसात कोरोनाबाधित तीन रुग्ण सापडले आहेत. त्यामध्ये एक पोलीस अधिकारी, दाभाडी येथील डॉक्टर पत्नी आणि येथील वैद्यकीय अधिकारी अशा तिघांचा समावेश आहे. पोलीस अधिकारी मालेगाव येथे कर्तव्यावर असताना ते बाधित झाल्याचे स्पष्ट झाले, तर डॉक्टर पत्नी यांना त्यांच्या पतीपासूनच कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. हे दोन्ही रु ग्ण बागलाण तालुक्यातील नातेवाईक आणि अन्य व्यक्तींशी संपर्कात आल्याने त्यांना विलगीकरण करून त्यांच्या स्वॅबची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली. सुदैवाने सर्वांचे वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला होता. या आठवड्यात चक्क वैद्यकीय अधिकारीच सापडल्याने त्यांच्या संपर्कातील २३ जणांना विलगीकरण केंद्रात भरती करण्यात आले होते. सोमवारी (दि.१८) अखेर सर्वच वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्यामुळे तब्बल १४ कर्मचाºयांना विलगीकरण केंद्रातून मुक्त करण्यात आले आहे .-------------------------------------संपर्कातील व्यक्तींचे अहवाल निगेटिव्हताहाराबाद येथील निवासी असलेल्या आणि सटाणा येथील पंचायत समितीच्या आरोग्य विभागात गेल्या दोन महिन्यांपासून सेवेत असलेल्या वैद्यकीय अधिकाºयाने गेल्या आठवड्यात दक्षता म्हणून काही प्रमुख अधिकाºयांचे स्वॅब चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यांचे अहवाल गेल्या रविवारी प्राप्त झाले. पैकी त्या वैद्यकीय अधिकाºयाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणा चांगलीच हादरली. यंत्रणेने तत्काळ त्यांच्या संपर्कात आलेल्या एकूण २३ जणांना विलगीकरण करून त्यांचे स्वॅब तपासले असता सर्वच्या सर्व नमुने निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. असे असले तरी बाधेचे मूळ शोधण्यात आरोग्य यंत्रणेला अद्याप यश आलेले नाही. सूत्रांच्या म्हणण्यानुसार वैद्यकीय अधिकारी ताहाराबाद येथील निवासस्थान ते सटाणा पंचायत समिती एवढाच दोन महिने प्रवास आणि संबधितांशी संपर्कआला आहे. त्यामुळे कोरोनाची बाधा झालीच कशी याबाबत यंत्रणा अधिकच बुचकळयात पडली आहे. त्यामुळे परिसरात अजूनही कोरोनाबाधित आढळण्याची भीती आरोग्य यंत्रणेकडून व्यक्त केली जात आहे.
..पण, ‘त्यांना’ बाधा झाली कुणापासून?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 10:03 PM